STORYMIRROR

Ramdas Hore

Others

3  

Ramdas Hore

Others

अबला नाही तू सबला ग

अबला नाही तू सबला ग

1 min
142


स्त्रीला अबला समजणाऱ्या,

शुंभ, निशुंभ, महिषासुराला,

सात्विक पार्वतीच्या महाकाली या

रुपाने मृत्यूचे घाट उतरविले ॥१॥


चारीत्र्यसंपन्न सीतेच्या अपहरणाने,

सोन्याच्या लंकापती, अमर रावणाच्या,

दहा शिरांची छाटणी होवूनी,

राज्य धूळीस मिळाले ॥२॥


वस्त्रहरण झालेल्या क्रोधित द्रौपदीमुळे,

महाभारतातील कौरवांचे,

दुष्ट , व्यभिचारी, दुर्योधनाचे,

साम्राज्य उध्वस्त झाले ॥३॥


तसेच या कलियुगामध्ये,

स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या, 

वासनांध, क्रूरकर्मी, नराधमांसही,

फासांवर लटकाविले जावे ॥४॥


लेक वाचवा, लेक शिकवाचे,

धडे फक्त गिरवू नका,

जन्मापासूनच नको असणाऱ्या स्त्री ची

मोठेपणी अशी विटंबना होवू देऊ नका 


पुरे झाले आता रडत , विव्हळत बसणं, 

करुन दया मुलींना ताकदीची जाणीव,

भिण्यापेक्षा शिकवा समाजाची भिडणं,

नाजूकापेक्षा बिजलीच रुप धारण करणं ॥ ६॥


निर्माण करा तिच्यात प्रचंड आत्मविश्वास

 लाठी, काठी,कराटे, कुंफू, कुस्ती, 

निर्भया, असिफाचे बलिदान व्यर्थ न जाती,

अत्याचार करणाऱ्याची जिरेल कायमची मस्ती ॥७॥


Rate this content
Log in