Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Aditi Nairale

Others

4  

Aditi Nairale

Others

आयुष्याच्या सहवासात

आयुष्याच्या सहवासात

1 min
357


आयुष्याच्या सहवासात

एक अनामिक ओढ

अन सुखदुःखाच्या

गणितातील आकडेमोड ,


एक एक दिवसाला

वेळेचाही आधार वाटे

प्रत्येक वेळ मला

विलक्षण भासे,


प्रत्येक पावलांचा इथे

पडावा ठसा

आठवणीच्या गाभाऱ्यातील

घेतलेला वसा ,


साथ नी सोबतीची

होते जेव्हा उजळणी

तीच मज भासे

माझी मौल्यवान ओवाळणी ,


रुसवे-फुगवे आणाभाका

जगण्याची चढाओढ

मनाच्या अंतरंगातील

जाळून टाकू तेढ ,


नवा दिवस

नवी ताकद

ना कुठली खंत

ना कुठला खेद ,


सुंदर अशा संधीप्रकाशाचे

होऊन जाऊ साक्षीदार

ना भय ना चिंता

झुगारून लोकनिंदेची लक्तरं ,


पाऊल वाटे वरच्या ठेचा

अन जाणिवेची फुंकर

माझी माती अन नाती

हेच माझे अलंकार,


धरणीच्या गर्भातील

आपण दोन बिजांकुर

वाट आहे पावसाची

धरणीचे उदर ,


अंतराच्या गाभाऱ्यातील

घंटानाद घूमू लागतो

त्या तिथे सहवासाचा

परिमळ दरवळू लागतो,


आयुष्याच्या संधीप्रकाशात

कुठूनसे यावे कवडसे

त्यातही मज मोहक

मोरपीस भासे ,


चार दिशांचे चार सोहळे

लख्ख न्हावे प्रकाशात

अंगणी असावी माझ्या

रातराणीची बरसात

रातराणीची बरसात !!


Rate this content
Log in