आयुष्य
आयुष्य
1 min
319
आयुष्य हे तांदळासारखे असते
त्यात खडे असतात म्हणून कोणी,
तांदूळ टाकून देत नाही
तर त्यातील खडे काढतात
आणि बनतो
मऊशार खडेविरहित भात
आयुष्याचंही काहीसं असंच
त्यात टीका, मत्सर, हेव्यादाव्यांचे खडे असतात
म्हणून कोणी जगणं सोडत नाही
उलट ते काढून टाकले की,
उरते ते...
सुंदर समाधानी आयुष्य..
