STORYMIRROR

Amrut Telang

Others

3.1  

Amrut Telang

Others

आपण फोडतो का पाषाण ?

आपण फोडतो का पाषाण ?

1 min
41.2K


जमीनीत गळ टाकून बसलोय आम्ही

पाणी गळाला लागेल म्हणून

आभाळाला असतात डोळे

अन् आभाळालाही असतात कान

सालाबादाप्रमाणे

शिगोशिग भरलेल्या कणग्या रित्या होतात

मुटकुले चिटकुल्यांचाही लागतोच की तळ

बैलाच्या पाठीवर हिरव्या धाटाचा हिरवागार वळ

भूक लागल्यावर मायीचं आठवते का थान ?

तसं तहान लागल्यावरच आपण फोडतो का पाषाण ?

आनीदार हातांची होत नसते ओंजळ

मग पानीदार गावाची पालथी पडते घागर

अन् जमीनीत गळ टाकून बसलोय आम्ही

पाणी गळाला लागेल म्हणून ...


Rate this content
Log in