आला ऋतू हिरवा बरवा
आला ऋतू हिरवा बरवा
1 min
27.9K
आला ऋतू हिरवा बरवा ,
साज हिरवाळीचा नवा नवा || धृ. ||
वारे नवचैतन्याचे सुटले ,
सारे मृद् गंधाने, गंधित झाले |
निळ्या अंबरी, घनगर्दी दाटली,
श्यामल फडावरी ,बिजली नाचली |
आळविता पक्षी,' मल्हारा ', कोसळल्या,
अमृतधारा ss ,
आला ऋतू हिरवा बरवा ,
साज हिरवाळीचा नवा नवा ||१||
अंगे भिजली अवघी धरणी ,
हिरवी साडी नेसली तरु-वेलींनी,
शोभे चोळी रंगीत कुसुमांनी |
शुभ्र कंठहार गळा प्रपातांचे ,
बाजूबंद , मेखले सुंदर सरितांचे |
पायी तोडे दवबिंदू मोतीयांचे |
सजली ब्रह्मकन्या--विश्वसुंदरी ,
वसुंधरा ss ,
आला ऋतू हिरवा बरवा ,
साज हिरवाळीचा नवा नवा ||२||
