आई
आई
1 min
28.9K
आई जीवनाला अर्थ आहे तुझ्या असण्याने
कर्तुत्वाला थाप आहे तुझ्या आशीर्वादाने
अभ्यास घेताना एक शिक्षक
प्रेम करताना वात्सल्याचा झरा
मनातल जाणणारी मैत्रीण जणू
हातातील पैशावर घरखर्च चालवणारी एक अर्थतज्ज्ञच तू
तुला रेखाटताना आठवते ती फक्त श्याम ची आई
आपल दुखणं बाजूला ठेवून मुलांसाठी झगडणारी
नेहमी नवऱ्याच्या सोबत उभी राहणारी
घासातला घास दुसऱ्याला देणारी
खूप प्रेम करतेस तू आमच्यावर
म्हणूनच आज तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला
खूप खूप सुखी ठेव माझ्या आईला
