" आदरणीय , वंदनीय "
" आदरणीय , वंदनीय "
1 min
41.1K
आदरणीय , वंदनीय
पूजनीय , माननीय
चाललंय सगळं निंदनीय
काहीच नाही आदरातून
ना आहे मनापासून
सगळी संबोधने फक्त भीतीतून
कामं करा अशी, व्हाल आदरणीय
स्वच्छ प्रतिमा राखा, व्हाल पूजनीय
समाजकारण करा, व्हाल माननीय
मतदाराला किंमत द्या, व्हाल वंदनीय
कराल वाईट कामं, व्हाल निंदनीय
सद्सदबुद्धीसाढी आहे हे सगळं अनाकलनीय
जे चाललंय ते आहे सगळं अशोभनीय
भारतीयांची अवस्था झालीय अती दयनीय
