एसएम बाॅस हाऊसमध्ये आपले स्वागत!
स्टोरीमिरर सादर करत आहे एक अतिशय अनोखी लेखन स्पर्धा - एसएम बाॅस
संकल्पना
एसएम बाॅस हाऊसचा घटक म्हणून आपण किमान एक साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ठाराविक काळाने विशिष्ट टास्क दिला जाईल. तुम्ही दिलेला प्रत्येक टास्क पूर्ण करणे आवश्यक असून तसे न केल्यास तुम्ही विजेत्यांच्या स्पर्धेतून बाद व्हाल. टास्क खालीलप्रमाणे आहेत -
टास्क १ :
कथेसाठी -
रोमॅन्टिक कथा लिहा, ज्यातील पात्र रिॲलिटी शो जिंकण्यासाठी एकमेकांना डेट करत आहेत.
कवितेसाठी -
वृद्धावस्थेतील प्रेमसंबंधावर आधारित ९० ते १५० शब्दांची कविता लिहा.
टास्क २ :
कथेसाठी :
एलियन्सनी पृथ्वीला भेट दिल्याची थरारक अंतराळकथा लिहा.
कवितेसाठी :
सुनित लिहा.
सुनित म्हणजे काय?
पारंपरिक सुनित काव्यात १४ ओळी असतात आणि त्यात प्रामुख्याने प्रेम-प्रेमातील विरह-वियोग, वैवाहिक प्रेम, विस्मृतीतले प्रेम, निरंतर प्रेम आदी भावना व्यक्त केल्या जातात.
टास्क 3
कथेसाठी -
एका खोलीत, एक वर्षाचा कालावधी दाखवणारी कथा लिहा.
कवितेसाठी -
एलेजी/शोकगीत लिहा.
एलेजी/शोकगीत म्हणजे काय?
उत्तर - एलेजी/शोकगीत म्हणजे शोकात्म कविता, बहुतेकदा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी लिहिलेली. परंतु, त्यात व्यक्तीसमुहाबद्दल किंवा प्रचंड नुकसानाबद्दलचा शोकही व्यक्त केलेला असू शकतो. एलेजी/शोकगीतात अनेकदा शोकांतिका ते सांत्वन असा प्रवासही वर्णिलेला असतो.
टास्क 4 -
कथेसाठी -
रहस्यकथा लिहा, ज्यात गुप्तहेराला अखेरच्या क्षणी आपण चुकीच्या संशयिताला पकडल्याची जाणीव होते.
कवितेसाठी -
बॅलड लिहा.
बॅलड म्हणजे काय?
उत्तर - कवितेच्या माध्यमातून कथा वाचणे किंवा सांगणे याला बॅलड म्हणतात. मराठीतील, लावणी, पोवाडा काव्यप्रकाराचा बॅलडमध्ये समावेश होतो
टास्क 5
कथेसाठी -
अगदी किशोरवयापासून एकत्र असणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची प्रेमकथा लिहा.
कवितेसाठी -
मुक्तछंद काव्य लिहा, पण त्यात ताल किंवा यमक असू द्या.
टास्क ६
कथेसाठी -
आपले मागील अनेकानेक जन्मातील आयुष्य आठवणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल लिहा, पण त्याची आठवण ती व्यक्ती सोडून पृथ्वीवरील दुसऱ्या कोणालाही नसते.
कवितेसाठी -
कमीत कमी दहा ओळींची विनोदी/उपहासात्मक/मजेशीर कविता लिहा.
नियम :
* स्पर्धकांनी दिलेल्या टास्कवर आधारित साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे
* विजेत्यांची निवड संपादकीय गुण आणि पूर्ण केलेल्या टास्कच्या संख्येवर केली जाईल
* स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे अावश्यक आहे. स्पर्धक अनेक साहित्य रचना सादर करु शकतात, त्यासाठी संख्येची मर्यादा नाही.
* आपल्या साहित्य रचनेत #SMBoss हॅशटॅगचा वापर करावा
साहित्य प्रकार :
कथा
कविता
भाषा :
इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, ओडिया, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम
पुरस्कार :
* दिलेले सर्वच टास्क पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना रु. १५० मूल्याचे स्टोरीमिरर व्हाऊचर प्रदान केले जाईल.
* विजेत्यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल.
* प्रत्येक भाषा आणि प्रत्येक साहित्य प्रकारातील शीर्ष ५० साहित्य रचनांचे ई-बुक प्रकाशित केले जाईल.
साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : २ एप्रिल २०२१ ते १ मे २०२१
निकाल : ३१ मे २०२१
संपर्क :
ईमेल : neha@storymirror.com
फोन नंबर : +९१ ९३७२४५८२८७