#Be A Poem: Poetry Writing Challenge

PARTICIPATE

Share with friends

परिचय


मानवी उत्कटता आणि कल्पनाशक्तीची भाषा म्हणजे काव्य. कवितेतील एकेक शब्दाशब्दात खोल अर्थ दडलेला असतो.


गेल्यावर्षीच्या 'चला कविता होऊया' या उपक्रमाच्या घवघवीत यशानंतर स्टोरीमिररने भारतातील सर्वात मोठी आणि एकमेवाद्वितीय काव्यस्पर्धा पुन्हा एकदा आणली आहे, खास काव्यप्रेमींसाठी. आपली कल्पना शब्दांच्या माध्यमातून स्वतःच्या भाषेत व्यक्त करणार्‍या सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे.


नियम


सदर स्पर्धा फक्त कवितांसाठी आहे


तुम्ही सुनित, वात्रटिका, हायकू, वर्णन, महाकाव्य, यमकयुक्त काव्य आणि मुक्तछंद अशा सर्वच प्रकारात कविता लिहू शकता


तुम्ही तुमच्या आवडत्या कवींसाठी एखादी कविता समर्पितही करु शकता


प्रत्येक भाषेतील विजेत्यांचा निर्णय संपादकीय गुण, वाचकांची पसंती संख्या, कवितेवरील टिप्पण्या आणि मानांकनाच्या आधारे घेतला जाईल.


स्टोरी मिररचा निर्णय अंतिम आणि सर्व सहभागींना बंधनकारक असेल


सहभागींनी त्यांच्या मूळ कविता सादर केल्या पाहिजेत. तुम्ही कितीही कविता सादर करु शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही.


कथा आणि लेख/निबंध सादर करण्यास परवानगी नाही


या स्पर्धेअंतर्गत सादर केलेल्या कविता डिलीट केल्या जाणार नाहीत.


बक्षिसे


प्रत्येक भाषेतील शीर्ष 3 विजेत्यांना स्टोरी मिररकडून 250 रुपयांचे व्हाऊचर मिळेल


प्रत्येक भाषेतील शीर्ष 20 कविता स्टोरी मिररच्या कविता विशेष ई-बुकमध्ये प्रकाशित केल्या जातील


सर्व सहभागींसाठी सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल


पात्रता


स्पर्धेचा कालावधी - दि. 10 जून 2020 ते दि. 10 जुलै 2020


निकाल - 31 जुलै 2020


भाषा : सर्व


साहित्य प्रकार : कविता