STORYMIRROR

#Summer Writing Fun

SEE WINNERS

Share with friends

उन्हाळा सुरु झाला असला तरी तो नेहमीसारखाच नाही, बराचसा वेगळा आहे. कारण आपल्यासमोर कोरोनाचे आव्हान उभे ठाकलेले आहे. त्याचबरोबर परिस्थिती आपल्याला बरेच काही शिकवते, लेखनासाठी आपल्याला बर्‍याच कल्पना देते, हेही खरे आहे. त्यामुळे आपलीही प्रगती होते आणि सर्जनशीलतेची, अभिव्यक्तीची संधीही मिळते.

डू विथ लिटच्या सहकार्याने स्टोरीमिरर सादर करत आहे, ‘समर राईटिंग फन’ लेखन स्पर्धा, ज्याद्वारे तुम्हाला लेखन कौशल्य जगाला दाखवून देण्याची संधी मिळेल.

चला तर मग, मजेदार लेखन अनुभवासाठी तयार राहा!!!

विषय - उन्हाळा

नियम :

  1. उन्हाळा या विषयावर आपण आपली साहित्य रचना सादर करु शकता.
  2. लेखन शैलीचे कोणतेही बंधन नाही.
  3. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
  4. सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करावी.
  5. साहित्य रचना सादर करण्याच्या संख्येला कोणतीही मर्यादा नाही.
  6. कोणतीही शब्द मर्यादा नाही.
  7. ईमेल किंवा टपाल/कुरिअरद्वारे किंवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य मार्गाने सादर केलेली साहित्य रचना प्रवेशास पात्र नसेल.
  8. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  9. आपल्या सहभागाची प्रमाणपत्रे आपल्या प्रोफाइलमध्ये प्रमाणपत्र विभागात उपलब्ध आहेत.

साहित्य प्रकार :

कथा

कविता

भाषा : इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.

बक्षिसे :

  1. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
  2. प्रत्येक साहित्य प्रकारातील आणि भाषेतील अव्वल 2 विजेत्यांना रु. 100 चे स्टोरीमिरर शॉप व्हाऊचर मिळेल तसेच त्यांच्या साहित्य रचना डू विथ लिटच्या इन्स्टाग्राम पृष्ठावर प्रसिद्ध केल्या जातील.
  3. सर्व विजेत्यांना विजेता प्रमाणपत्र दिले जाईल.

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : 19 एप्रिल 2021 ते 14 मे 2021

निकाल : 25 जून 2021

संपर्क :

ईमेल : neha@storymirror.com

फोन नंबर : +91 9372458287