STORYMIRROR

Achala Dharap

Others

2  

Achala Dharap

Others

मोग-याच्या फुलांची जादू

मोग-याच्या फुलांची जादू

1 min
69

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

  शब्दरुप आले मुक्या भावनांना


  चैत्र महिन्यातील ती संध्याकाळ! मोगरा मस्त बहरला होता. हिरव्या पानांवर मोती ठेवल्याचा भास होत होता. मोग-याच्या वासाने सारा परीसर धुंद झाला होता. अबोली खिडकीतुन बहरलेला मोगरा बघत होती. तिच्या मनात आलं माझ्या मनातील मुक्या भावनांना कधी बहर येईल का?

  अबोलीला ते संग्रामचे शब्द आठवले. लोकांसाठी म्हणून तू माझी बायको आहेस. पण माझ काॅलेजमधल्या मुलीशी प्रेम होतं. तू माझी बायको होवू शकणार नाहीस. त्या दिवशीपासुन अबोली अबोल झाली नि तिच्या भावना मुक झाल्या होत्या. 

  आज अबोलीचा वाढदिवस होता. तिने छान साडी नेसली. बागेतील मोग-याच्या कळ्या काढुन आणून त्याचे भरपुर गजरे केले नि केसात माळले होते. वातावरण अगदी गंधीत झाले होते. संग्राम खोलीत आला आणि त्या मोग-याच्या वासाने एकदम धुंद झाला.पाठमो-या उभ्या असलेल्या ,शृंगार केलेल्या अबोलीकडे तो एकदम आकर्षित झाला. त्याने मागन जाऊन अबोलीला एकदम मिठी मारली.... तृषार्थ जमिनीवर पहिला पाऊस पडल्यावर जसा मृद्गंध दरवळतो तशीच अवस्था अबोलीची झाली नि ती संग्रामच्या बाहुपाशात विसावली.मुक्या भावना आता बोलू लागल्या होत्या.


मोगरा केसात माळताच

काय जादू झाली

त्याने हळूच मिठी मारली

नवीन प्रित बहरुन आली


Rate this content
Log in