STORYMIRROR

Achala Dharap

Others

4  

Achala Dharap

Others

हिरो

हिरो

1 min
292

 सिनेमातल्या हिरोने काय मस्त फायटिंग केलेय अशी चर्चा करतं एक महिलांचा गृप रात्रीचा शो बघून घरी चालला होता. तितक्यात समोरनं एक माणूस आला आणि त्याने खिशातला सुरा काढून महिला वर्गाला धमकावून त्यांच्या अंगावरचे दागिने खेचून घेतले. मागून येणा-या मुलाने प्रसंगावधान राखून त्या माणसाच्या दिशेने धाव घेऊन त्याच्या हातातला सुरा उडवला आणि त्याच्याशी फायटिंग करून दागिने परत मिळवले.

  महिला वर्ग टाळ्या वाजवत कौतूक करत म्हणाल्या,'आमच्यासाठी खरा हिरो तूच आहेस!'


साहित्याला गुण द्या
लॉग इन