सर्व मी..
सर्व मी..
1 min
1.0K
सर्व मी....
मला खंत नको मनाची,
मला भ्रांत नको जगाची,
मला नको नियमावली बेड्यांची,
मला स्वयंभु होउद्या!
मला गरज नाही रक्षकांची,
तुमच्या कुठल्याही विचारांची,
माझी मीच पुरे मला,
मला स्वयंरक्षक होउद्या!
मला आवश्यकता नाही दीव्याची,
कोणत्याही आधाराची,
मीच सुर्यप्रभा किरणांची,
मला तेजाग्नी होउद्या!
मला गरज नाही छायेची,
कुठल्याही छताची,
मीच शोभा क्षितीजाची,
मला आभाळमाया होउद्या!
मला काय सांगड घालता खेळाची,
अन् कुठल्या त्या मायेची,
मी स्वयं माया ती,
मला सौम्यच राहुद्या!!!!!