STORYMIRROR

Saily Smarth

Others

3  

Saily Smarth

Others

सर्व मी

सर्व मी

1 min
14.5K


मला खंत नको मनाची,

मला भ्रांत नको जगाची,

मला नको नियमावली बेड्यांची,

मला स्वयंभू होऊ द्या!


मला गरज नाही रक्षकांची,

तुमच्या कुठल्याही विचारांची,

माझी मीच पुरे मला,

मला स्वयंरक्षक होऊ द्या!


मला आवश्यकता नाही दीव्याची,

कोणत्याही आधाराची,

मीच सुर्यप्रभा किरणांची,

मला तेजाग्नी होऊ द्या!


मला गरज नाही छायेची,

कुठल्याही छताची,

मीच शोभा क्षितीजाची,

मला आभाळमाया होऊ द्या!


मला काय सांगड घालता खेळाची,

अन् कुठल्या त्या मायेची,

मी स्वयं माया ती,

मला सौम्यच राहु द्या!!!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Saily Smarth