आई, तू सर्वस्व
आई, तू सर्वस्व
1 min
202
आई, तू सर्वस्व, तू जगच;
तुझ्याविना वाटे अपूर्णच.
तू फक्त जन्म दिणारी नव्हे,
तर माझा सांभाळ व लक्ष देणारी असे.
तू सर्वसंपन्न, शक्तीशाली ही
असते तू त्याग करणारी, काळजी घेणारी.
मी कितीही मोठी झाली तरही,
तुझ्या हाताने खाल्ल्यास भरते पोट, आताही.
तुझा आवाज ऐकल्यास
घरी परतल्याचा होतो भास.
तुझे होते स्वप्न अपूर्ण
मी करेल ते सगळे पूर्ण.
पुढच्या वर्षी बाहेरगावी गेल्यावर
कसं राहणार मी तू नसताना ?
