STORYMIRROR

Mayuri Thorat

Others

4  

Mayuri Thorat

Others

दादा,मी वाट तूझी पाहिलं??

दादा,मी वाट तूझी पाहिलं??

1 min
518

माय बाप सरकारने,बापाच्या इस्टिटत म्हणे,मुलीला ही दिलाय वाटा,

बहिणभावाच्या प्रेमाला मला तरी वाटत ह्यांमुळेच फुटलाय फाटा…


दादा, तुझ्यात आणि माझ्यात आहे एकाच बापाचं रक्त,,

इस्टिटी पोटी तु स्वार्थी होऊ नकोस फक्त,,

नको तुझी संपत्ती नको मला वाटा…

तुझ्या माझ्या प्रेमाचा दादा नको आटवू साठा…


ह्यावेळी तू भाऊबीजेला ताटात बक्कळ ओवाळणी टाकली,,

तितक्यात वहिनी माझी कानात तुझ्या काहीतरी पुटपुटली,,

तसाच हसतहसत तू कागद पुढे केला…

ताई ह्यावर सही दे हे तू किती सहजच बोलून गेला…


 "आता माहेर ही परक होईल"?

 हा विचार मनात माझ्या धडकी भरून गेला,,

नको मला संपत्ती नको मला वाटा,,

फक्त इतकंच सांग दादा,मी सही केल्यावर, बापाच्या हयातीत जशा मोकळ्या होत्या,तशाच मोकळ्या राहतील ना मला माहेरच्या वाटा..


नको घेऊस चोळी नको मला साडी,,

येईल ओढीने वर्षातून तुला दोनदा भेटायला,, इतकिच नात्यात आपल्या राहू दे गोडी,,माय बापानंतर म्हणे, पोरीचं माहेर ही जात...

एकदा स्वतःची लेक मोठी झाली की, भावाला बहिणीच प्रेम कुठं लक्षात राहत...


भाऊबीजेला ओवाळून ती तुला राखीही बांधत जाईल,आई ताई प्रमाणे दादा लेक तुझी काळजी घेईल,पण दादा ,ह्या दोन सणांना तरी तू घ्यायला येशील.. या आशेने मी वाट तुझी रे पाहत जाईल 

मी वाट तुझी रे पाहत जाईल....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन