विषय..आठवणीत राहिलेल बालपण
विषय..आठवणीत राहिलेल बालपण
1 min
230
आठवले माझे बालपण
शोधू कुठे पाखरांना
यशाच्या शोधात धाव
घेऊन विसरले सर्वांना...
रम्य ते बालपण माझे
हरपून सवंगडी गेले
आठवणीतले खेळ सारे
जण विसरुन. राहिले...
नव्याने ओळख करून
जिवाभावाची मैत्री जमली
पाटीवरती शब्द गिरऊन
काळजात माझ्या भिनली...
वर्गात बसून खोडकर
ती बँचवर मजा मस्ती
हसत खेळत चालायची
नेहमी संघर्षाची कुस्ती....
खेळ खेळलो रस्सीउडी.
लपंडाव गोटागोटी अंगणी
विटीदांडू चेंडू फळी डाव
रंगला शानदार मैदानी....
सुट्टीचा दिवस जायचा
नदी किनारी पोहायला
हिरवेगार डोंगर भरलेलं
रानमेवा आस्वाद घ्यायला...
