Atreya Dande

Children Inspirational Others

4.8  

Atreya Dande

Children Inspirational Others

वहाणा विसरला, अं देव पावला!

वहाणा विसरला, अं देव पावला!

3 mins
1.8K


आमच्या आई (अज्जी) सारखी फक्त आईच. इतकी प्रेमळ व्यक्ती जगात असूच शकत नाही, हो खरच, आई शप्पथ खरच. आईविना तिन्ही जगाचा स्वामी ही भिकारी, तर आज्जीविना तो स्वामीच घडू शकत नाही. पहिले-पहिले आपले सगळे लाड, संस्कार आज्जीच पुरवते की. तर अशी आमची आई देवाच खूप करायची...देव म्हणजे जणू तिचा पाठीराखाच. देवाच आणि आमच करता करता पाठीच हाड किती वाक्तय हे तिच्या लक्षातच यायच नाही. आम्हा नात्वान्कडून पाठ चेपुन घेत असत ती. "आत्र्या, पाठ दुखतेरे माझी, छान चेपून दे बघ." मग हळूवार बोटांनी तिची पाठ चेपायचो. तिच्या पाठीवरची नुसती हाडच लागायची बोटांना. पण जाणीव ना होऊ देता अलगद चेपायचे. नकळतच डोळ्यांच्या कोपर्‍यांतून टिपुसभर पाणी डुंकवायचे. की इतक्यात आई माग पाहून म्हणायची, बर वाटतय आता. तिच्या मुक्त व समाधानी मुखदर्शणामुळे ते टिपुस डोळ्यातच लपायचे. त्याची हिंमतच नव्हती बाहेर पडायची. त्या वेळी रुपयाला तासभर सैइकल खेळायला मिळायची. तिच्या मुळे सैइकल शिकता आली. पोळीचे काळवण करून पोटभरूस्तोवर खाउ घालायची ती माउली. तिच्या हातची नुसती वरणपोळी सुद्धा पंचपकवांनाँपेक्षा अधिक रुचकर लागायची. आईच्या खोलीत डाइनिंग टेबल होते. खोली पाकखान्याजवळच होती. ती निजायची ते सुद्धा पोटभरण केंद्रानजीकच की. आप्पांची जेवणाची वेळ ठरलेली असायची. ती झाली की टेबलावर ताट वाढून द्यायची. अप्पा पटकन जेवणारे होते. तिच्या खोलीत होता तो एक आरसा.  अप्पान्नी खास तिच्यासाठी आणला होता तो. पण लई उंचावर नेऊन ठेवला होता. माझी अज्जी मात्र पालंगावर बसूनच केस विनचारायची. पण तो आरसा कधी तेथून हल्ला नाही. आम्हीच आमच्या उंचीचे नाप घेत, त्या आरशात आमच्या केसांची ठेवण घडवायचो. आईचा टोला मागून लगेच यायचा "ए हीरो व्हयायचा का!". अं तिच्याकडे मागे वळून हसायचे अं हीरो झाल्या ऐटीत तिथून कॉलर उंचावून निघायचा. की आप्पांची खोली लागताच कॉलर आपोआप खाली यायची. निमुटपणे जमिनीवरची फर्शि जास्तच जवळ आल्यासारखी वाटायची. किंबहूना मान तीतकी खाली जायची.  


आईला कधी राग आलेला तर पाहिलाच नाही. जीव प्रेमात गुंतला म्हणल की त्यात रागही विरघळुन जात असावा. तिच्या कुशीत तर जगातले सर्वात सुखी लेकरच झोपत होती. आम्हीपण तर तीचीच लेकुरे कि. 


तर ह्या मायेच्या हिमालयासोबत एक आठवतय. ते अस की आई आणि काँताबाई, हिच्या बद्दल लिहीन परत, ती सुद्धा आईरूपच की आमची. ह्या दोघी एकदा पुण्यात आल्या होत्या. त्यांच्या आणि वडिलांसोबत आळंदी, देहू, केतकावळे, नारायणपूर देवदर्शन करण्याचा योग आला. केतकावाळे बाळाजी मंदिराचे दर्शन घेतल्यावर, एक सदग्रुहस्त तेथे भेटले. त्यांनी नारायणपूरला नक्की जा, असे सुचविले. तसे आम्ही दिवसाच्या शेवटी शेवटी रात्री नारायणपूर, श्री गुऋुदुत्ताच्या दर्शनासाठी आलो. नारायणपूर तसे चांगदेव महाराजांचे गाव बरका. रात्रीचे ०७:०० ची वेळ होती. श्रीक्षेत्र नारायणपूर देवस्थान, केतकावाळेच्या बालाजी मन्दिरापासून डाव्याबाजूने वरच्या रस्त्याला अवघ्या ०९ की. मी. अंतरावर आहे. देवस्थान तसे रस्त्यालागतच आहे. आत शिरले की समोरच चौकोनी भिँत्ींमधे देव्हारा आहे. तो चहुकडून बंद होता. देव्हर्याला दरवाजा होता, पण तो इतका छोटा की फक्त दोन हात जातील इतकाच. बंद असल्या कारणाने आम्ही मागे असलेल्या गुऋुदुत्तच्या एक्मुखि मूर्तीचे दर्शन घेतले. मूर्ती वरचे तेज पुन्ज्य जणू जीवनाच मार्गदर्शनच करत होते. मन्दिराला लागूनच महादेवाचे श्री नारयनेश्वराचे पुरातन मंदिर आहे. त्याचे ही दर्शन घेऊन आम्ही परत गाडीत बसून निघालो. थोड्या अंतरावर गेल्यावर असे लक्षात आले की माझ्या पायातले वहाणे मागे मंदिरातच राहीले. परत गाडी वळवण्यात आली. परत आलोत, तशी आरती ची वेळ झाली होती. ताल मृदुंगावर थाप ठोकून ध्वनीची पडताळणी चालू होती. त्या बंद देव्हार्‍या अवतीभोवती सगळे बसले होते.  तशी आई म्हणाली, चला आरती साठीच देवाने आपल्याला परत बोलावले आहे. अगदी मनातलच बोलली ती. आरती म्हणणार्‍यांनी माइक हाती घेतला आणि एकास्वरात टाल, आणि मृदुन्गाची सन्ग साधत मंजुळ आरतीचे स्वर कानी पडत होते. ते कधी थामबू नये असेच वाटत होते. आरती झाल्यावर, देव्हार्याचा "तो" दरवाजा हळूच उघडण्यात आला. सर्वजण दर्शनाची रांग करू लागले. तसेच आम्ही पण रांगेत लागलो. मला दरवाजाजवळ गेल्यावर लक्षात आले की मूळ मूर्तीचे पदुका दर्शन, हे आरती झालयावरच ह्या दरवजातून होते. दर्शन झल्यावर आई म्हणाली, अत्र्या तुझ्या वाहान्यापोटी मूळ मूर्तीचे पदुका दर्शन झाले मला. पुन्हा येईन की नाही माहीत नाही, पण हे दर्शन पावल रे मला. तेव्हा तिच्या शब्दांचा अर्थ उमजला नाही, पण समाधानी वाटत होते. 


तर अशी ही गोष्ट. तो दिवस तर आठवणीत कोरला गेलाच होता. पण त्या दिवसाचा शेवट हा इतका सुंदर व इतका मनात दडून बसला की आईची एक अविरत आठवण म्हणून आजही राहतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children