वावटळ
वावटळ


अंधारुन आलं होत , दिवसभराच्या कामानं दमलेला शिवा घर जवळ करत होता. कोमट गरम पाणी हाता-तोंडावर घेऊन कप-बशीभर
चहा प्यावा , चिमुकल्या रामदास व गीताला भाकरी-कोरड्यास होईपर्यंत खेळवावं असा विचार करत तो झपाझप चालत होता. दुरूनच त्याला घराभोती माणसाची गर्दी दिसत होती. बायांचा ओरडण्याचा रडण्याचा आवाज येत होता. शिवाच्या काळजात धस्स झालं. पायाचा वेग आणखीनच वाढला . शिवा घराच्या दिशेने पळत सुटला. चोची वासणाऱ्या पिलांसाठी
चारा घेऊन रानातून भिरभिरणाऱ्या पाखरानं घरट्याजवळ जाताच ते उद्ध्वस्त झालेले पहावं असं समोरचं दृश्य पाहून शिवाची अवस्था झाली.
चार वर्षापूर्वी भूमिहीन शिवा आपलं जन्मगाव सोडून बायको व तीन साडेतीन वर्षच्या गीतासह आत्याच्या गावी तिच्या सांगण्यावरुन आला होता. तेथील एका जमीनदाराकडे तो सालगडी म्हणून काम करत होता. आपल्या आयुष्यात त्याने अनेक चढ-उतार पाहिले होते. दरूपायी त्याला आलेलं मरण बापाच्या मरणाचा धसका घेऊन माय अंथरूणात पडली. अन् तीही तशीच त्याच्या मागे निघून गेली. अशा पारिस्थितीत आत्यानेच त्याचं लग्न केलं व आपल्या गावात आणून त्याला काम मिळवून दिलं होतं. राहातं गाव त्यानं सोडलं पण वडिलोपार्जित असलेले कर्ज चुकतं न झाल्यामुळे देणेकऱ्यानी त्याची पाठ सोडली नव्हती. जसं जमलं
तसं शिवा प्रत्येकाचं देणं हळूहळू चुकतं करत होता. मालक पैसे वेळेवर नाही पण मागेपुढे करुन देतच होता. फार चांगलं नाही. पण बऱ्यापैकी चाललं होतं. शिवाच्या वंशाचा दिवा. गरिबीमुळे शिक्षण न घेतलेल्या
शिवाला शिक्षणाविषयी तळतळ होती. अक्षर ओळखीपुरतं शिक्षण त्यानं कसंतरी पदरात पाडून घेतलं होतं. ते घेऊन तो हुशार झाला नव्हता ,
पण शिक्षण विषयीचं महत्व समजण्याइतपत शहाणपण आलं होतं म्हणून मुलगी असूनही त्यानं शाळेत घातलं होतं. ' रामराव देशमुख , शिवाचा
जमीनमालक शिवाला राहण्यासाठी त्यानं गावानजिक तुरळक वस्ती असलेला जुना गोठा राहायला दिला होता. पर्वीच्या गोठ्याचं आता
,घर , झालं होतं. मालकाची शेती गावानजिक तशी गावापासून दूर अशी विभागलेली होती. शिवा त्यात राबराब राबत होता. पुर्वीचं देणं , बायको , पोरं असा सगळा व्याप सांभाळत आपला गाडा हाकत होता. गरीबीचं आयुष्य जगत होता. अन् मालकाच्या भरवशावर देणेकऱ्यांना दिलेला शब्दही . संवेदनशील शिवाचं मन चिंतेनं उभं राहत होतं. कल्पनेनं काहीतरी . साकारत होतं.अधूनमधून मालक येत होता . बाकी असलेल्या
कामाचा पाढा वाचत होता. पण सालगड्याच्या मिळकती विषयी बोलण्याचे टाळत होता. हे सर्व शिवाच्या सहनशक्तीपलीकडे जाऊनही तो दाताखाली जीभ दाबून शांत राहात होता. ओढ्यातल्या कुंडामधले पाणी दिवसेंदिवस कमी-कमीच झाल्याने त्यातल्या माशाने रागात पुर्ण ताकदीनिशी सुर मारावा आणि पडून अधिकच वेदनेने तडफडावे जाण्यासाठी त्याच आशेने
आज ना उद्या परिस्थिती बदलेल या आशेने शिवा गप्पच होता. गीता व रामदास , शिवाची दोन मुलं. रामदास तान्हुला तर गीता दोन वर्षापासून शाळेत जात होती. तान्हुला रामाला सांभाळत होती. कोवळ्या वयातही परिस्थिती ओळखून आईला शेतात -घरात होईल तशी रडत-पडत मदत करत होती. शाळेचे जुने कपडे फाटल्यामुळे द्वारकाने गावातल्या दुकानातून तिला कपडे आणले होते. बाजाराची काळवटलेली , ठिक ठिकाणी फाटलेली थैली ती दप्तर म्हणून वापरत असे ,म्हणून शिवाने तिला शनिवारी आठवडी बाजारातून दप्तर आणले होते. आदल्या
दिवशी नवाकोरा ड्रेस व नंतर दप्तर मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता. शाळेत जाऊन वर्गातल्या सोबतींना दप्तर कधी दाखवावे असे तिला झाले होते. चिमुकली गीता फारच उत्साहित झाली होती.जुन्या दप्तरातील कोपरा फुटलेली पाटी , रंगीबेरंगी लेखणी , वरवरची पाने अर्धवट फाटलेली पुस्तके , मधल्या सुटीत खेळण्यासाठी जमा केलेले गोल , गोल खडे , कागदापासून बनवलेले बटवे , त्यातील चिंचोके , कधीतरी मिळालेले आणे-आठ आणे अगदी जीव लावून सांभाळून ठेवलेले हे सर्व काढून ,तिने नवीन दप्तरात ठेवले. ते पाठीवर लटकाऊन घराभोवती
मोठ्या रूबाबत दोन फेरफटके मारले. त्या बालमनात आनंदाचे फवारे उडाले. पुन्हा पुन्हा ती दप्तरातील पुस्तके काढून जागा बदलून ठेवत . रात्री आईने ,दे आता ठेवून , म्हटल्यावर तिने ते घरातील लाकडी डिळीला लटकवून ठेवले . आनंदाने भारावलेली गीता विचार करत झोपी गेली. त्या रात्री तिला अधूनमधून जाग आली तेव्हा ती तशीच पडल्या-पडल्या दप्तराकडे बघात व पुन्हा झोपी जाई . दुसऱ्या दिवशी रविवार शाळेला सुटी होती .गीता आईसोबत उठली . तिला कामात मदत केली . त्या चिमुकल्या हातांनी तिने कपडे घुतले . आदल्या दिवशी घातलेला शाळेचा नवा कोरा गणवेशही धुतला अंगणाबाहेरील गवतावर तिने तो सुकायला टाकला . वारंवार दप्तराला पाहून स्पर्श करून उद्या ते पाठीवर
घेऊन शाळेत जात असल्याची जणू ती कल्पना करत .पहाटीचे न्याहारी करून दुपारी भाकरी पालवात बांधून घेऊन शिवा दुरवरच्या शेतात निघून गेला . द्वारका-गीता व रामदासला घेऊन नजिकच्या वावरात गेली . खुरपण्याच्या कामामध्ये गीताही आईला होईल तशी मदत करत होती . दिवस डोक्यावर आला होता . पावसाळ्याचे दिवस असूनही उन्हाचे दाहक चटके लागत होते . जिकडे-तिकडे माणसं दिसत होती .पिक डवरताना फवारणी करताना गाई-ढोरे वळताना फवरणीच्चा पंपाच्चा गुरांना दिलेल्या आरोळीच्या मंद झुळूक वाऱ्याच्या आवाजाने शिवार संगीतमय झाले होते . द्वारका गीताला म्हणाली , गीता , जा पातीलं भरून पाणी आण ,, भाकरी खाऊ भूक लागलीय नं? हो ! म्हणत गीतानं रिकामं झालेलं पातीलं उचललं अन् पाणी आणण्यासाठी धाव घेतली . नवीन कपड्यांच्या
व दप्तरांचा आनंद सोबतीला होता . फक्त उद्याचा दिवस
यायचा हाेता . हरणाच्या कळपातील नेमकेच उड्या मारत चालू-पळू लागलेल्या पिला प्रमाणे गीता पळत होती . दम लागला की मध्येच थांबत होती . परत परत पळत होती . पायात चप्पल कधी आलीच नव्हती . त्या कोवळ्या चिमुकल्या पायांना अनवाणी राहायची सवयच होती . अचानक गीताच्या तोंडून अय मायव वेदनामय आवाज निघाला . ती थांबली , खाली बसली . तळपाय बघितला . पायात नेहमीप्रमाणे काटा मोडला . असे म्हणून तिने निरखून पाहिलं पण काहीच दिसलं नाही . विहिरीवर असलेल्या गणाकाकाने तिला पातीलं भरून दिलं . डोक्यावर घेऊन ती माधारी निघाली आता मात्र पायात आग वेदना होत होत्या . तशीच ती आई
जवळ कोहोचली . आईला सांगितले , काटा टोचला असेल म्हणून आईनेही निरखलं पण काही दिसलच नाही. गीता रडत होती डोळ्यासमोर अंधार येत होता .मळमळत होत. बांधावरील गवतात गीताला सर्पदंश झाला होता .कामाच्या व्यापात असलेल्या आईला ते कळलंच नव्हतं ." तुझा बाप आल्यावर पाहू " ,जमलतर दवाखान्यात जाऊ .असं म्हणत तिने शेजारील झाडाखाली गीताला झोपवलं .मांडीवर झोपलेल्या रामदास ला झोक्यात टाकून ती कामाला लागली.गीता बेशुध्द होऊन पडली होती. तान्हुल्या बाळाने दुधाची उलटी करावी.तसा तिच्या तोंडातून फेस आला होता.संध्याकाळ होत आली तरी गीता उठली नव्हती .झोक्यातला रामदास रडायला लागला.द्वारकाने त्याला झोक्यातून काढुन कडेवर घेतले.गीताला दोन चार आवाज दिले.गीते ,गीते,गीता गतप्राण होऊन पडली होती.दुपारी संगीतमय असलेले शिवार ढगाळलं होत.वारा लगाम नसलेल्या घोड्यासारखा मध्येमध्ये उधळू पाहत होता .द्वारकाने टाहो फोडला होता.शेजारील माणसं धावत आली होती.सर्व घडलेले कळाल्यावर किसन आजीने टाचेवरील भागावर असलेले तीन छोटे व्रण पाहून 'पण'( साप चावल्याचे )लागल्याचे लक्षात आणूण दिले होते .निष्प्राण देह उचलून घरासमोरील अंगणातल्या बाजेवर आणून ठेवला होता. रडारड चालली होती. बायका द्वारकाला सांभाळत होत्या.रामदासला काहीच कळत नव्हतं .निपचित पडलेल्या ताईकडे पाहत तोही रडत होता.विचाराचं वादळ डोक्यात घोंघावणार शिवा दारात येताच त्यानं गीताला छातीशी कवटाळलं. आकाशातल्या ढगांचा गडगडाट व्हावा तसा हंबरडा फोडला. 'गीता, गीता, व ' आयुष्यातील सुरवात होण्यापूर्वी आयुष्य संपलं होतं. वाऱ्याच्या झोतावर डूलू पाहणाऱ्या रोपट्याचा शेंडाच खुडवा तसा काळाने गीतावर घाला घातला होता. लेखणी साठी, बागळण्यासाठी,कधी फाटलेला झगा शिवून घेण्यासाठी रडणारी गीता शांत पडली होती .इतरांना रंडवत होती.
खुंटीला टांगलेले दप्तर, धुऊन वाळू घातलेले ड्रेस यांच्याशी तिचं आता काहीएक घेणं नव्हतं.