स्वर्ग नक्की कुठे आहे
स्वर्ग नक्की कुठे आहे
भारतीय संस्कृतीत "स्वर्ग म्हणजे " जिथे सर्वांनाच सुख समाधान आनंद मिळणारे ठिकाण ." हा स्वर्ग नक्की कुठे असतो ?" असा जर प्रश्न विचारला ,तर मी म्हणेन जो माणूस नेहमी स्वतःला आनंद ठेवायचा प्रयत्न करतो ,तिथे त्याचा स्वर्ग असतो . वृद्ध मंडळी भजन-कीर्तनात आपला वेळ घालवितात. देवाचे नामस्मरण ,चिंतन करतात . तर काही वृद्ध मंडळी आपल्या नातवंडा बरोबर खेळून आपले मन रमवितात . त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा स्वर्ग त्यांच्या नातवंडामध्येच आहे . आज कालची तरुण मंडळी मोबाईल मध्ये गुंतलेली दिसतात . त्यावर गप्पा मारणे ,चॅट
िंग करणे , व्हिडिओ काढणे, गाणे ऐकणे यामध्ये आपल्या वेळ घालवतात . काही तरुण मंडळी पार्ट्या करणे , मौजमजा करणे , ट्रीप ला जाणे यातच समाधान मानतात. या मंडळीचा स्वर्ग या गोष्टीमध्ये आहे . मी एक गृहिणी आहे . माझा स्वर्ग म्हणजे घरच्या व्यक्तीला खुश ठेवणे हा आहे .यासाठी मी त्यांच्या आवडीचे जेवण करते , सदैव त्यांना वेळ देते .त्याच प्रमाणे मोकळ्या वेळेत मी लेख व कविता लिहिते , फिरायला जाते यामध्ये मला आनंद मिळतो माझा स्वर्ग हाच आहे . शेवटी मी हेच सांगेन ,प्रत्येकच स्वर्ग त्याच्या मनाला आनंद देणारा ,आवड निर्माण करणारा हा असतो .