Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


संवाद लेखन

संवाद लेखन

2 mins 480 2 mins 480

(मनीच्या लग्नाला ३० वर्षे झाली.आणि आज तिला Whatsapp च्या माध्यमातून तिचा शालेय मित्र भेटलाय.)


मनी- काय रे? मॅक किती वर्षांनी भेटतोय?

मॅक- हो,ग खरच ..

मनी- खूप आनंद झाला रे मनाला.

मॅक- अग मला पण खूप झालाय.

मनी- बर ,चल माझ्या घरी .निवांत गप्पा मारू

मॅक- अग आत्ता जरा बिझी आहे उद्या येतो मी. पत्ता दे मला.

मनी- (त्याला पत्ता देते) नक्की ये ह मी वाट पाहते.

मॅक- हो, तर अग एवढ्या वर्षाने भेटतेस हा चान्स सोडिन अस वाटतय का?

(दोघेही १ली ते १० वी एका वर्गात शिकलेले.प्रेम करणे पाप हे त्यावेळी मनावर बिंबवलेले .पण मॅकच्या मनात मनी बसलेली होती.तो मनापासून तिच्यावर प्रेम करायचा.दुसर्‍या दिवशी बरोबर चारला मॅक तिच्या घरी जातो.घरी कोणी नसते.दारावरील बेल वाजते.मनी दार उघडते)

मॅक - वा!मनू किती छान आवरलेस ग!

मनी- अरे!तुला आवडतो न लाल रंग मग मला ते आठवले नी मग ही साडी घातली.

मॅक- ए,मनू सर्व मॅचिंग घातलेस खूपप सुंदर दिसतेस अजूनही.

मनी- काहीही ह मॅक तुझ.

मॅक- मला तर तू दहाविच्या सेंड ऑफला नटलेली, मुरडत चाललेली सर्वांना घायाळ करणारी ती मनू आठवली.

मनी- नको रे एवढी स्तूती करू, तू पण मुद्दाम माझ्या आवडीचा निळा शर्ट घातलास न. 

(लाजते गोडडड)

मॅक -हंं...कसा दिसतोय सांग तरी.

मनी- झक्कास रे....अगदी मला जसा आवडतो तसाच आलास रे तू .

मॅक- मग आज खूप वर्षांनी मी माझ्या प्रेमाला भेटायला आलोय?

मनी- काय!

मॅक- हो! मनू मी तुझ्यावर खूप प्रेम करायचो ग! पण आपल्या परंपरांनी ,रूढींनी मला जखडले होते.पण आता काय उपयोग ग. तू परक्याच धन आहेस .पण प्रेम निष्पाप, निष्कलंक आहे ग माझे.

मनी- अरे वेडा त्या वेळी जरा बोलायचे तरी,मागणेतरी घालायचे रे मला.आता काय रेस ऊपयोग?

मॅक- हो.आता काही ऊपयोग नसला तरी ,तू माझी एक जवळची मैत्रीण ,जीवाभावाची,सुखादुःखात साथ देणारी अशी हवी आहेस,करशील माझी साथ,देशील मला वचन?

मनी- होय. नक्कीच करीन तुझी साथ.

मॅक - बघ ह आता माघार घेवू नकोस .जेवढे जीवन उरले तेवढी साथ दे मला.

मनी- होय रे मँक .

(तेवढ्यात तिचा नवरा येतो.)

मनी - मॅक हे माझे मि. सचीन.

मॅक-नमस्कार सर.

सचीन-( जरा रागावलेला दिसतो. जरा रागातच ) ह कोण आपण ,कधी आलात,काय काम ?असे प्रश्न विचारतो.

मनी- हा माझा शाळेतील मित्र मकरंद .

मॅक- हो.आम्ही दोघे एकाच वर्गात होतो पहिली ते दहावी.

सचीन- अरे वा!मग छानच ओळख आहे की .बसा गप्पा मारत मी जरा फ्रेश होतो.

मनी- (चहा ठेवते ) मँक आता परत ये भेटू गप्पा मारू .आपल्या मित्रांना पण भेटू. 

मॅक - (चहा पाणी घेतो) चल आता निघतो ग मी .

(मनीच्या डोळ्यात आश्रू तरळतात)

मनी- आता तर भेटलास मॅक जाऊ नको तू सोडून

तू जर गेलास तर रे 

जाईल प्राण हा निघून...


Rate this content
Log in