श्री महादेव भुमका जागृत देवस्थानचा शिगमोत्सव सोहळा....
श्री महादेव भुमका जागृत देवस्थानचा शिगमोत्सव सोहळा....
गोव्यातील डिचोली तालुक्यातील साळ येथील दि. ०२ मार्च रोजी श्री. महादेव भुमका जागृत देवस्थानचा शिगमोत्सव सोहळा प्रारंभ होणार आहे. सकाळी ९:०० वा श्री. महादेव भुमका मंदिरात श्री चरणी पुरोहित आव्हानात्मक ग्राहणे देऊन श्री म्हारिंगण देवाच्या वाद्याने देवदेवतांना नमन करण्यात येईल.
तद्नंतर सकाळी १०:०० वा. ठरवलेल्या गावात होळीच्या ठिकाणी जाऊन इतर देवकार्य करण्यात येईल. श्री माडवेश्वर देवाच्या जयघोषात गजर करत मिरवत साळ ठिकाणी येईल. साळच्या सिमेवर होळी येताच राखणदार श्री. घवनाळेश्वर व श्री. जठारेश्वर मशाल ज्योत पेठवून स्वागत करत श्री देवीच्या मंदिरापर्यंत मनोरंजन करत ग्रामस्थांना वेगवेगळ्या ठिकाणी मशाल दाखवून देवस्थान जागृत असल्याचे प्रभाव होळीसंग नाचत मिरवत श्री महादेव प्रागंणापर्यत मौज करत असतात.तसेच मानापमान ने राऊत व परब महाजन व रयतकुळ याच्या सहाय्याने होळी {आंब्याची/भीरण व फणस या वृक्षाची } एकोण ५०-६० फुट उंच असलेली आंबाच्या पानाने सजविली जाणार आहे.पहाटे दि. ०३ रोजी ४:०० च्या दरम्यान होळी मुळपाया उभारणी करताना श्री. गडेवंसचे मानकरी राखणदार श्री करयेश्वर व श्री दाडसाखळेश्वर, श्री आड्येश्वर हे मशाल ज्योत पेटवून स्वागत करत असतात. तसेच पहिल्या दिवसाचे दुसरे मानकरी श्री घवनाळेश्वर नकळत मशाल झोक पेटवून स्वागत करत असतो. संध्याकाळी ठिक ५:०० वाजता फक्त गडे मंडळ व्यक्ती स्मशानभूमीत स्मशान राखणदाराला ३६५ गाव १२ पंचायतन चाळाची आव्हानात्मक सिमेची ख्याती असलेले श्री. माडयेश्वर देवाला बक-याचा बहुमान काढून पुरोहित वर्ष पध्दतीने चाळाची आव्हानात्मक सांगणे देण्यात येईल.माघाच्या राखणदाराला काळभैरवसंग पाठराखण करण्याचे आवाहन करतो.
तदनंतर श्री म्हारिंगण देवाच्या वाद्याने देवदेवतांना नमन करून श्री सिध्देश्वर देवाच्या होळीकडे नमन करून रोमटामेळाचे मानकरी कै. रामा तारी या घराण्यातील श्री. माडयेश्वर देवाच्या जयजयकाराने संपुर्णपणे रस्ता भर मिरवत रोमटामेळ खेळ करत #माड्यावलो_देवसार_ईलो_रे_हातीत_मोतीयाचो_झेलो_रे या गजर जयघोषाने श्री महादेव व भुमका देवीच्या प्रांगणात भाविकांचे मनोरंजन करत होळीकडे विसावा घेण्यात येईल. भाविकांची ग्राहणे बोलणे होळीकडे संपताच लगेचच श्री महादेव भुमका होळीकडे श्री पुरोहित गाडगीळ श्री महादेव रवळनाथ व भुमका देवीस, पंचायतन,गडेवंसचे राखणदाराना सांगणे देताच राऊत, परब, नाईक, घुरे,महाले,च्यारी गडेवंसचा हुंकार देत भाराने डोलू लागतात. ढोल_ताशाच्या व नमन गायनाने तल्लीनतेच्या जोगणीचा खेळ प्रारंभ होतो. माय श्री भुमका व महादेव गडेवंसचे भाराना खेळवून करयेश्वर चरणी मार्ग दावितो.मशाल पेटताच गडे धाव घेतात ती श्री करयेश्वर चरणी काही तासानंतर श्री करयेश्वर चरणाकडून येताना पुन्हा एकदा पाठवणीची मशाल दावून गडे परत करवले हातात घेऊन होळीकडे परताव घेतात. पुन्हा परताव घेत असताना देवस्थानचे प्रथम मानकरी श्री. दाडसाखळेश्वर व राखणमाय एकत्र गडे परत करते. तदनंतर गडे चिरखण या दिशेने धाव घेतात. काही तासाने दुसरे मानकरी श्री. बाबरेश्वर गडे देण्याचा निर्णय घेतो व अपुल्या चरणापर्यत गड्याची धाव व म्हारिंगण दांडेकर पिल्गी येईपर्यंत स्वगडा अपुल्याकडे ठेवत मशाल तेजस्वी रूपाने अपुल्या सिंहासनकडे गड्याना घेऊन जातो व मशाल झोक पालवून गडे विसर्जित पाठवण करतो. तसेच पहिल्या दिवसाचे तिसरें मानकरी ढोलाची धुंद ऐकू येताच म्हारिंगण देवाचा गण अपुल्या पर्यत येत असल्याचे भासता श्री घवनाळेश्वर लगेच मशाल दाखवत भाविकांना अनेक रूप स्वरूपाने मनोरंजन करत नाचवत मिरवत अपुल्या बस्की सिंहासनापर्यत घेऊन जातो. राऊत व परब याचा मान घडवून आणतो गडे पुन्हा होळीकडे परतीला लावतो. गडे पुन्हा करयेश्वर चरणी करवली पाठवण करण्यासाठी धाव घेतात पुन्हा तिथून येऊन होळीकडे पहिल्या रात्रीची सांगता म्हणून होळीसमोर विसावा घेतात.
दि. ०४ रोजी रात्री ८:०० वाजता म्हारिंगण देवाच्या वाद्याने आव्हान तसेच श्री सिध्देश्वर मंदिराकडून तारी,पडवळ रोमटामेळ खेळ करत ढोल ताशाचा गजर करत श्री महादेव मंदिरात पर्यत येतात. रात्र प्रहरात १२:३० वाजता पुनर्श दुस-या रात्रीला पुरोहित गाडगीळच्या सांगण्याने देवताना आव्हान दिले जाते. गडे हुंकार देत श्री करयेश्वर देवाच्या चरणीं धाव घेतात.काही तासांनी करवले घेऊन परत वाटेकडे धाव घेतात. त्यातप्रकारे श्री देव आडयेश्वर, ओवळेश्वर, चिंचेश्वर, आंबेश्वर, हे राखणदार खेळाचे रहस्य उघड करण्याचे धाडस करतात. नकळत श्री जठारेश्वर मानाप्रमाणे राऊत घराण्यातील गड्याना अपुलासा करून घेतो अन् गड्याचा सहायाने माघ दावून म्हारिंगण गणाची वाट पाहत अर्ध्या वाटेवर येऊन थांबतो.अन् भाविकांना दर्शन रूपी मशाल मनोरंजन मळावर खेळ घडवून आणतो.गड्याची जोडीस्वरूपी परत करतो. तदनंतर हे चिंचेश्वर किंवा ओवळेश्वर मानाचा अधिकारी होतात. व गड्याची परतवण करून पुन्हा करवली पोचवून करयेश्वर चरणी धाव घेतात आणि तिथून येऊन होळीकडे सांगतेचा विसावा घेतात.
दि. ५ रोजी रात्री ७ : ०० वाजता श्री महादेव भुमका देवीच्या प्रागंणात म्हारींगण देवाच्या वाद्याने नमन करण्यात येईल. तदनंतर तारी घराण्यातील परंपरेनुसार रोमटामेळ श्री माडयेश्वर देवाचा जयघोष करत होळीकडे रात्री १२:३० उशीरापर्यंत रोमट येता श्री. गाडगीळ पुरोहित कडुन सांगणे व घाडी नमन गाण्यास सुरूवात करताच गड्याचा हुंकार मिळताच गडे अपुल्या दिशेने धाव घेत इतर राखणदार चरणाकडे लक्षवेधक पण राखणदार श्री पाताळेश्वर अपुला बहुमान घडवून आणतो. तसाच काही तासाने भुमिका देवीच्या फाटलेपुर्वात मंदिरामागे देवसार मशाल पेटवून भाविकास आकर्षित करतो.
तदनंतर शेवटापुर्वी श्री राष्टोळी, धवडा_राष्टोळी व ठिकाणी मशाल पेटवत स्मशानभूमीतून श्री महालक्ष्मी ( म्हालकुमी ) या ठिकाणी महाले, परब किंवा राऊत अशी जोडीरुपी गडे देतो. व शेवट्याच्या कार्याकडे भाविकांचे लक्षवेधलेले असताना राखणदार श्री. माडयेश्वर देव शेवटची सूत्रे हाती घेण्याकरिता अपुला राऊत घराण्यातील मानकरी याना अपुला कडून विसर्जित गडा पाठवण करतो.
तेव्हा स्मशान दारीचा राखणदार शेवटाकडे चाळेगत सोडून गडेवंसाना स्मशान प्रदान करण्याचा अधिकार भूतबाधा चाळेगतीला मान घडवून आणतो. या वेळी भूतपूर्व _ भूतचाळा किंकाळी ओरडा ओरड करत सांगतेला वळतात शेवट हुंकार न देता हळुवार स्मशन घेत, कुणी शेतातील बुजगावणे, पालवीउस्की, मडकी,तिरडीचा-दांडा, सरणाचे जळके लाकूड,विविध आकर्षित स्मशन घेऊन होळीकडे फेरी मारताना भाविक मंत्रमुग्ध होतात व काही भूतबाधा असल्यास निघून जाते. अन् पुन्हा पाऊल खेळ करताना घाडीकडे व म्हारिंगण पिल्गिला हुंकार देत पाऊल मारत राहतात व परतीचा निरोप घेण्यासाठी या पिल्गिला कटश्य नजरमारून स्मशन वाट पावले धाव घेण्यास राजी होतात तदनंतर एक एक स्मशन घेत स्मशन वाटकडे चालत जातात व तिथून लगेच येऊन हुंकार देत घाडी व म्हारिंगण पिल्गिला पाहून होळीच्या ठिकाणी विसावा घेतात असे तीन रात्री जोगणीचा खेळ असतो.
दि. ६,७,८ या दिवशी गावोगावी देवीची तळी व नवनवीन गड्याना घेऊन घरोघरी शब्बय घातली जाते. सातव्या दिवशी दुपारी होळीला रंग उधळून सांगते कडे वळले जाते. संध्याकाळी ठिक ५:०० वाजता राऊत,परब व घाडी घोडे मानकरी नेसून वाजत-गाजत होळीला सिमेवर हजेरी लावून घोडेमोडणी साजरा करण्यात येईल व रात्री तीर्थाने सांगता होते.
नाव : उमेश लक्ष्मण परवार ,गोवा.मो.९६३७१६४१८९
