शिर्षक : धर्मामुळे....
शिर्षक : धर्मामुळे....
आम्ही सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,
पण बाम्हणानी तर प्रतिशोध घेतला...
मंदिराच्या आत फक्त पाषाण
पुजण्याचा उद्योग धंदा सुरूच
पण मंदिराबाहेर दंगा,लढाई
युध्द सत्याचा शोध मिळतच नाही
कधी कायदा ही येतोय मंदिरात
पण धर्म आणि संस्कृती भयभीत
झालेली दिशाहीन युध्द बळजबरी
करत आहे " मानापमान " हवाय
मानापमानाचे युध्द खळबळ करत
युध्दाला आव्हानाची सूरी दाखवत आहे
कधी मंदिरात तर कधी संस्कृतीतून
पंरंपरेचे मुखवटे आज रक्त मागत आहे
पाषाणाला आत्ता खेत्रपण कळी
वादळ उठले फक्त हक्काचे मानापमानाचे
आपण विसरलोय भगवा बलिदानाचा
फडकत आहे एकतेचा दावा करत
हे युध्द फक्त युध्द नाही माणसामध्ये
इथे कपटपूर्ण तर्क बाम्हणाचा पोट व्यवहार आहे
बाकी पाषाण हे बंदिस्तसुध्दा
युध्दाला आव्हानाची बळी घेतोय
रात्र फक्त चंद्राची देखरेखीसाठी
तिथेसुध्दा कायापालट आहे पौणिमेचा
चंद्रसुध्दा आक्रोश होतोय सूर्याच्या
भेटीसाठी तेव्हा काहीतरी घडतय
हे युध्द आहे बंदिस्त हिंदू धर्मात
चालीरीतीच केवळ महाजनांच्या मानापमानसाठी
बाकी खेळ ही युध्द आहे जिंकण्यासाठी
हक्कासाठी दलित उंबरठ्यावर आहेत धर्मासाठी
अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी कायदासुध्दा
लागू होत नाही कारण "धर्मामुळे....."
युध्द हे युध्द माणसामध्ये सुरु आहे
खेळ हा वृतीचा नारा बाम्हणी आहे "धर्मामुळे.... "
