Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

विश्वास

विश्वास

2 mins
188


     सन् २००० सालापासून बहुजन हिताय वसतिगृहात माझी विद्यार्थी म्हणून निवड झाली. तेव्हा मी ११ वर्षाचा होतो, तशाच मी चौथी पास सरकारी प्राथमिक शाळा साळ येथे शिकून वसतिगृहात प्रवेश केला. 

वसतिगृहात पाचवी ते पुढील शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी होते. या काळात मला कुठलीच अनुभूती तेवढी नव्हती. कमी कमी वयात घरापासून दूर राहणे हेच प्रथम दु:ख घरातल अनेक आठवणी व आठवणीतील रडू येणे हे साहजिकच आहे. 

पण या वसतिगृहात मला हवे ते अनुभव मिळू लागले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारसरणीने बहुजन समाजाने शिकावे आणि समाजाचे पुढारी होऊन एक सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे. तशीच पाचवी पासून जनता हायस्कूल म्हापसा गोवा पुढील दहावी पर्यत शिक्षण घेतले. 

वसतिगृहात बुधवारी रात्री धम्मवर्ग घेतला जायचा. या धम्म वर्गात अनेकजण ओळखीचे विचारवंत तिथे यायचे. तसेच वर्ग संपल्यावर सहज विद्यार्थी शालेय प्रश्नो्तर विचारून ज्ञानाची परीक्षा घेतली जायची. 

एकेकाळी असाच धम्म अनुभव यावा म्हणून मी सातवीत असताना धम्मशिबिराला उपस्थित राहिलो. धम्म अजून स्विकारला नाही तरी ही मी धम्म शिबिराला उपस्थित राहून आगळे वेगळे समविचार आचरणात आणिले. 

माणसाने ध्यान धारणेतून मन एकाग्र कसे ? करावे याची जाणीव तिथे प्रकट झाली. सन २०१० नंतर वाचनाची ओढ लागली, वाचनातून २०१३ पासून कवितेचे शब्द गिरवू लागलो. जून २०१४ मध्ये प्रथम "दुरच दूर " या कवितेतून सरळ यशवंत त्रैमासिक अंकात कविता छापून आली. 

    ती प्रथम कविता मनपरिवर्तन करण्याच्या जाणिवेतून शब्द कवितेला मिळू लागले. कवितेचे अनेक छंद शिकलो ते असे चारोळी, षटकोळी, सहाक्षरी,अभंग, हायकू, अखंड काव्यक्षर व इतर असे कवितेचे प्रकार येऊ लागले.बहुजन हिताय वसतिगृह हे असे कित्येकतरी विद्यार्थ्याना व विद्यार्थी्नीना घडवून एक प्रगतीशील वाटसरू बनविले आहे.



Rate this content
Log in

More marathi story from Umesh Parwar