श्रावण... सणांचा राजा
श्रावण... सणांचा राजा


आज पहाटेपासून कुसुमताईंची लगबग सुरू होती. पहाटे 5 वाजता उठून ,प्रातःविधी आटोपून, सडा रांगोळी करुन लवकर स्नान केले आणि चहाचं आधण गॅसवर ठेवले तोवर नंदिता स्वयंपाक घरात आली होती. " अग, नंदिता आटोप लवकर. आजपासून श्रावण सूरु झालाय न आणि आज पाहिला श्रावण सोमवार आहे लक्षात आहे न तुझ्या" इति सासूबाई.
"हो आई सगळी तयारी रात्रीच करून ठेवलीय , माझे पण सगळे आवरलं आहे , आता फक्त चहा घेऊन पूजेला सुरुवात करू आपण दोघी ". इति नंदिता. चहा घेऊन दोघींनी नवीन जरीच्या साड्या नेसल्या. छान तयार झाल्या. देवघरात खरच नंदितानी उत्तम पूजेची तयारी केलीे होती. कुसुमताई प्रसन्न पणे हसल्या दोघीनी मिळून महादेवाच्या पिंडीवर 108 बेलपत्रं वाहिली , जप केला, पूजा आरती नैवद्य दूधाचा अभिषेक सगळे यथासांग केले. दिवसभर उपवास केला आणि सायंकाळी
महादेवाच्या मंदिरात जाउन आल्या . कुसुमताई आणि नंदिता दोघीही प्रसन्न दिसत होत्या. आजचा दिवस खूप छान गेला होता.
"नंदिता उद्या तुझी पहिली मंगळागौर बाळा... बरं झालं की सगळी पूर्वतयारी झालीय आपली , तुझ्या मैत्रिणी ज्या पूजेसाठी बसणार आहे त्यांना परत एकदा फोन कर आणि खात्री करून घे हं नाहीतर वेळेवर कांहीतरी अडचण यायची" सासूबाई नंदिता ला म्हणाल्या. "आई , तसे काही होणार नाही, त्या सगळ्याजणीनी तर साडी कोणती नेसायची हेदेखील ठरावलंय " नंदिता हसून म्हणाली
पाहिली मंगळागौर म्हणून नंदीताच्या सासरच्यांनी पूजेच्या विधीपासून ते जेवणा पर्यन्त काँट्रॅक्ट दिला होता सगळ्या पाहुणे मंडळींना आग्रहाचे आमंत्रण स्वतः त्यांच्या घरी जाऊन दिले होते. मंगळागौरीची गाणी नाच खेळ सर्वकाही पूर्वनिःशीत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर सगळ्यांची घाई गडबड सुरू होती गुरुजी येण्याच्या आधी सगळ्यांची तयारी जवळपास झाली होती. नंदीताच्या मैत्रिणी नातेवाईक नीलेश , मीनल चे मित्र मैत्रिणी शेजारी अगदी सगळे जण उत्साहानी जमले होतें . आणि मजा मस्ती करत होते. गुरुजींनी पण मंत्र जप विधिवत पूजा सांगत होते वेगवेगळ्या फुलापानांची सजावट , महादेवाची पिंड सजवली होती. संस्कार भारताची रांगोळी ...सगळंच कसं सुंदर आणि आकर्षक ...
त्यानंतर गाणी खेळ जेवणं जागरण सगळे खूप उत्साहाने पार पडले. कुसुमताई नानासाहेब निलेश मिनल नंदिता सगळेच जण हा सुंदर दिवस आपल्या मनात साठवून खुश होते.
शुक्रवार ... श्रावणातील पहिला शुक्रवार ... सवाष्णींला आदल्या दिवशी निमंत्रण दिले होते त्यामुळे
निर्मलताई कुसुमताई ची मैंत्रिण बरोबर 12 वाजता आल्या त्याआधी दोघी सासू सुनेनी मिळून गोडा धोडाचा स्वैपाक केला होता सवाष्णीची ओटीची तयारी केली होती. आणि महालक्ष्मी वंदन पूजन देखील झाले होतें. हा दिवस सुध्दा छान गेला होता.
त्यानंतर आला नागपंचमी चा सण नागाचे पूजन दुधाचा नैवेद्य,
पुरणावरणाचा स्वैपाक नादितांनी आणि कुसुमताईंनी मिळून केला.
पोळा... यादिवशीचं बैलांचं विशेष महत्व त्यांनी महती कुसुमताई नंदीताला सांगत होत्या बैलांची पूजा त्यांना सजवायच त्यांना आराम करू द्यायचा जे आपल्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करतात शेतात राबतात ऊन पावसाची पर्वा न करता काम करतात त्या दिवशी त्यांना पुजायचं ...
खरंच कित्ती सुंदर असतो न श्रावण महिना , वेगवेगळ्या सणांना घेऊन येणारा ...प्रत्येक सणाचं एक वेगळेच महत्व सांगुन जातो हा श्रावण. सगळीकडे हिरवळ जणू आपली धरती माता हिरवाकंच शालू नेसून ,सुंदर फुलांचे अलंकार परिधान करून
मिरवते आहे असा भास होतो.
अशा या श्रावण महिन्यात नंदीताचे सर्व सण मोठ्या उत्साहात पार पडले. कुसुमताईसारख्या सगळ्याच सासवा असतील तर प्रत्येक सुनेसाठी किती भाग्याची गोष्ट असेल, हो न? सुनेचं कौतुक करणे, तिला मुलीसारखी जपणे, वेळोवेळी सांभाळून घेणं ह्याला खूप मोठे मन असावं लागतं.
चला तर मग आपण ही उद्याच्या सासवा होणार आहोत.
आपण ही आपल्या सुनेला मुलगी समजुन तिला भरभरून प्रेम देऊ या तिचं मनापासून कौतुक करू या..अगदी कुसुमताईंसारखं
आपलंही नातं सासू सुनेच नसून
माय लेकीचं फुलवू या ...
श्रावणातील सणांच्या लज्जीतीसारखं...या सणांसारख जे एकमेकांनमधे अतिशय सुन्दर रितीने बांधले गेले आहे.
श्रावणातील सरीवर सरी
निसर्गाची किमया सारी
सणांची ही साखळी न्यारी
लज्जत आणते जीवनात भारी