Sonali Gadikar

Others

1  

Sonali Gadikar

Others

"माझा समृद्ध देश"

"माझा समृद्ध देश"

3 mins
788         देशभक्ती ....केवळ हा शब्द उच्चरल्यानंतर देखील किती मन भरून येतं न ...खरच हे देशप्रेम, देशभक्ती आणि आपल्याला आपला देशाबद्दलचा अभिमान असायलाच पाहिजे. खूप काही दिलंय या भारत देशानी आपल्याला.. आणि म्हणूनच आपणही देणं लागतो. या पावित्र, सुजलाम ,सुफलाम ,मंगल देशाचं.आपला देश सुजलाम, सुफलाम आहे . विविध भाषांनी, विविध वेशांनी, वेगवेगळ्या संस्कृतींनी नटलेला आहे याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहेच.देशभक्ती ही कोणती सदृश वस्तू नाही की , जी दाखवता येईल, तर ती तुमच्या मनात उपजतच असली पाहिजे. आणि ती तुमच्या कृतीतून दिसायला पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून. "अनेकता मे एकता है।" हे ब्रीदवाक्य  सार्थ व्हायला पाहिजे.

        आज स्वातंत्र मिळून 72 वर्ष पूर्ण झाली आपल्या भारत देशाला, पण मित्रहो हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी महान वीरांना शहीद व्हावे लागले, आपल्या महान देशभक्तांनी, देशबांधवानी कशाचीही, अगदी आपल्या कुटुंबीयांची देखील

पर्वा न करता अगदी हसत हसत आपले प्राण या भारतभूमी साठी अर्पण केले ... असहनिय यातना सहन केल्या आणि मुखातुन एक शब्द सुद्धा उच्चरला नाही, ही त्यांची देशभक्ती जितकी अनमोल आहे तितकीच अवर्णनीय देखील आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस,  वल्लभभाई पटेल, चाचा नेहरू, बकीमचंद्र चॅटर्जी,  लाला लजपतराय, लालबहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुखदेव अशी एक ना अनेक किती नाव घ्यावीत. या सगळ्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी अथक प्रयत्न केलें , आणि अखेरीस त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या भाग्यात स्वतंत्र भारत बघणे नव्हते, त्यांचं स्वप्न हे स्वप्नंच राहीले. पण त्यांच्या त्यागामुळे आपल्याला हा सुदिन पाहायला मिळतो आहे....सलाम आहे त्या वीरांच्या देशभक्तीला... आपल्या सगळ्या भारतीयांना याचा गर्व आहे आणि त्यांनी दिलेल्या या बलिदानाची जाणीव देखील प्रत्येकाला असायला पाहिजे. 

    पण खरंच सांगा मित्रांनो, आपण काय करतोय आपल्या देशासाठी...? केवळ 15 ऑगस्ट आणि 26  जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करतो , कुठेतरीबाहेर फिरायला जातो किंवा देशभक्तीपर गीते ऐकतो,किंवा गातो. टेलिव्हिजन वर कार्यक्रम बघतो आणि तेवढ्यापुरते आपण खूप देशभक्त आहोत असे दाखवतो बरोबर न....?

    पण नाही आता मात्र हे दाखवण्यापूरते देशप्रेम नको इतर देशांच्या तुलनेत जर भारताला आपल्याला प्रथम

क्रमांकावर आणायचे असेल तर सुरुवात आपल्या घरापासून करायला पाहिजे. स्वच्छता अभियान, आर्थिक नियोजन, शिस्त, घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे , मुलांवर चांगले संस्कार करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलगा मुलगी यांच्यामध्ये भेदभाव न करणे , पर्यावरणाची काळजी घेणे,मुलींना शिकवून त्यांच्या पायावर त्यांना ऊभे करणे . आपण जर हे सगळे आचरणात आणले तर निःश्चितच याचा उपयोग समाजाच्या प्रगतीकडे एक पाऊल पुढे जाणारे असेल . एकीचे बळ असेल तर कोणतेही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते, याचे महत्त्व मुलांना पटवून दिले तर जातीभेद , वादविवाद हे  होणारच नाही, सगळ्यांना समान न्याय देता येईल गरीब श्रीमंत असा भेदभाव होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलेल्या संविधानाचे जर आज प्रत्येकांनी पालन केले तर आपल्यातील व्यक्तिमत्वचा विकास तर होईलच पण त्यासोबत देशातील प्रत्येक व्यक्तीचा आंतरिक आणि बाह्य विकास देखील होईल आणि आजचे बालक उद्याचे स्वतंत्र विचाराचे भारतीय नागरिक होतील . सांगायचं तात्पर्य आहे की, आपल्या घरापासून आपण सुरुवात करू या. आजचा बालक उद्याचा भारतीय सुजाण नागरिक होणार आहे हे लक्षात ठेवू या. आणि त्या बालकांवर , बालिकांवर चांगले संस्कार करू या. आपण या मुलांच्या मनात आतापासून देशभक्ती जागृत करू या आणि फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी म्हणजे देशप्रेम आहे हा गैरसमज दूर करू तर रोजच देशासाठी आपल्या योग्यतेनुसार आपले योगदान देऊ या. 

     आजच्या या कलियुगात सख्ख्या भावाचं सख्ख्या भावाशी इस्टेटी साठी भांडण होतं, बहीण बहिणीचा हेवा,मत्सर करते,जन्मदाते आई वडील मुलांना लग्न झाल्यावर नकोसे होतात, त्यांची जबाबदारी नकोशी होते,

मग जिथे घरात एकमेकांसोबत जे प्रेमाने आणि एकीनीराहू शकत नाही , जे आपल्या आई-वडीलांचा आदर

करू शकत नाही ते देशभक्ती काय करणार...? त्यांना आपल्या देशाबद्दल काय प्रेम वाटणार, ते निःस्वार्थ कसे होणार, कुठून जागणार त्यांच्या मनात निःस्सीम देशभक्ती...?

म्हणूनच आधी सुरुवात ही आपल्या घरापासून कराव लागणार आहे. वेळ पडली तर संकटात आपला भारत देश दुसऱ्या

देशालाही मदतीचा हात प्रत्येकवेळी देतच आला आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्यांना आर्थिक मदत आणि

मानसिक साह्य करणे तर आपल्याकडून शिकण्यासारखं आहे, आपले आर्मीतले जवान तर डोळ्यांत तेल घालून

देशाचं रक्षण करतात. ते तिकडे आपले रक्षण करतात, म्हणून आपण सुखाने सगळे सणवार साजरे करू शकतो आणि रात्री सुखाने , शांततेनी झोपू शकतो. हे देशप्रेम ही देशभक्ती

आपल्या मुलांच्या मनात आपण आत्ताच रुजवली पाहिजे.चला तर मग आज नव्हे तर या क्षणापासून आपण हे सत्कार्य करू या, देशभक्ती म्हणजे नक्की काय आहे हे भावी नागरिकांना- आपल्या मुलांना समजावुन सांगू या.

     


Rate this content
Log in

More marathi story from Sonali Gadikar