Priyanka More

Others

3  

Priyanka More

Others

शीतल वाऱ्याची झुळूक....

शीतल वाऱ्याची झुळूक....

5 mins
300


आज जरा निघायला उशीरच झाला.पण काय करणार सरांनी एवढं महत्वाचं काम माझ्यावर इतकं विश्वासाने आणि जबाबदारीने सोपवलं होतं की ते पूर्ण केल्याशिवाय मला निघताच आलं नसत...आणि निघाले असते तर सरांनी माझ्याबद्दल किती गैरसमज करुन घेतला असता की हिला एवढी मोठी जबाबदारी दिली आणि तीही हिने पूर्ण केली नाही ...नाही नाही बरं झालं मी ते काम पूर्ण करूनच निघाले...वैदेही स्वतःशीच पुटपुटत रस्त्याने चालली होती. पण ती आज आनंदात होती कारण तिने तिचं काम एकदम चोख केलं होत...त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हलकेच एक हास्य उमटले....चालता चालता ती नेहमीच्या बस स्टॉपवर येऊन स्थिरावली....


रात्रीचे 10.30 वाजले असतील रोज गजबजलेला रस्ता आज थोडा सामसूम वाटतं होता पण वैदेहीचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते ती तिच्याच विचारात गुंग होती तेवढ्यात हलकासा वारा वाहू लागला..... वारा हळूहळू त्याचा वेग वाढवत होता.,तशी वैदेही भानावर आली.. इतका वेळ आपल्याच विचारात असणाऱ्या वैदेहीला आता आजूबाजूची शांतता स्पष्ट जाणवत होती..तशी तिला थोडी भीती वाटू लागली. आज बसला पण काय झालं इतका वेळ का लागतोय याचा ती विचार करत होती पण बस काही येत नव्हती. म्हणून तिने पर्समधून मोबाईल काढण्यासाठी हात पर्समध्ये टाकला तेवढ्यात तिला समोरून 3-4 मुलांचा काही कुजबुजण्याचा आवाज आला म्हणून तिने वर बघितलं तर ती टवाळ मुल वैदेहीकडेच नजर रोखून काहीतरी बोलत होते पण ते जरा लांब असल्यामुळे तिला त्यांचा आवाज येत नव्हता पण ही मुलं आपल्याबद्दलच काहीतरी कुजबुजत असावी हे तिला पक्क जाणवले. पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन पर्समधून तिचा मोबाईल काढला आणि लॉक ओपन केलं पण आज बहुतेक तिचा दिवसच खराब असेल.. एक तर बस येत नव्हती आणि त्यामध्ये मोबाईलमध्ये फक्त १% 🔋 बॅटरी शिल्लक होती.आज सरांनी दिलेलं काम सोडले तर बाकी काहीच चांगले होत नव्हते. त्यामुळे तिला प्रचंड चीड येत होती. या बॅटरीला पण आत्ताचं लो व्हायचं होत अस ती मनाशीच म्हणाली...आत्ता तिला दूरवरून कुजबुज करणारे ते आवाज थोडे स्पष्ट ऐकू येऊ लागले..


तिला जाणवले की ती मुलं तिच्याच दिशेने पुढे येत आहेत...तशी ती घाबरली., हात पाय कापायला लागले हृदयाची धडधड भीतीपोटी वाढली होती....ती देवाकडे विनवणी करू लागली देवा माझी बस लवकर येऊ दे रे ..आत्ता तूच काहीतरी कर. तेवढ्यात मोबाईलही बंद पडला..आत्ता ती कोणाला फोन करून बोलावूही शकत नव्हती...मघाशी २-३ दिसणारी माणसेही आत्ता दिसेनाशी झालीत. त्या थंडगार वाऱ्यात वैदेहीचे केस उडू लागले होते ती त्यांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती पण त्या वाऱ्यापुढे तिचा तो प्रयत्न निरर्थक ठरला.. वैदेही त्या बस स्टॉपवरील लाईटच्या प्रकाशात खूप सुंदर दिसत होती. तिचे काळे डोळे,गोरापान वर्ण, कानात डुलणारे झुमके अन् ओठांवरचा तो तीळ तिच्या चेहऱ्याला उजाळत होता. त्याचसोबत तिचे वाऱ्यावर उडणारे लांबलचक केस तिच्या सौंदर्यात भर टाकत होते..पण तिच्या ह्या निरागस सौंदर्यात त्या वासानांधी नजरा आपले सावज शोधत होते..त्या मुलांचा आवाज तिला आता एकदम स्पष्ट येत होता कारण ती मुलं आता तिच्या शेजारीच उभी होतीत..


काय मग मॅडम कुठे जायचंय.. बस नाही येत आहे का? खूप उशीरही झाला आहे आत्ता बस काय येईल असं वाटत नाही चला आम्ही तुम्हाला सोडतो असं एकामागोमाग एक ती मुलं बोलत होती. पण वैदेही नको माझी मी जाईन असं सतत बोलून नकार देत होती..पण ती मुलं काही शांत बसत नव्हती त्याचं प्रश्न विचारणं, मध्येच विचित्र एकमेंकाकडे पाहून हसणं, एकमेकांना टाळ्या देणं चालूच होते.. वैदहीचे कपणारे हात आत्ता एकदम थंड पडले होते..तिला काहीच सुचेनासे झाले तेवढ्यात तिचा हात त्या मुलांपैकी एकाने धरला आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला., ती त्याला खूप प्रतिकार करुन आपल्या संपूर्ण शक्तिनिशी स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा तो प्रयत्न फोल ठरत होता...

   

तेवढ्यात अचानक शीतल वाऱ्याची झुळूक वैदेहीच्या चेहऱ्यावरून गेली अन् तिचे डोळे अचानक बंद झाले. आता जोरदार कुणालातरी मारण्याचा आवाज तिच्या कानावर पडला अन् तिच्या हातावरची जोरदार पकडही तिला जाणवत नव्हती. म्हणून तिने डोळे उघडले., तर एक मुलगा त्या मुलांना मारत असल्याचे तिने बघितले..५.८ इंच उंचीचा, दिसायला देखणा,त्याचे जेलने सेट केलेले ते केस, चेहऱ्याला शोभेल अशी दाढी व त्या मुलांना मारताना त्याचे folded sleeves मध्ये दिसणारे बायसेप्स ह्याकडे वैदही एकटक बघत होती. आपल्याला वाचवण्यासाठी कोणीतरी मुलगा त्या मुलांना मारतोय ह्या सर्व प्रकाराने ती स्तबधच झाली होती..

(फिल्मी वाटतयं का., पण काय करणार आत्ता आपला हिरो आहेच fighter त्यात माझी काय चूक....)


त्या मुलाने पोलिसांना फोन करून त्यांना पोलिसांच्या हवाली केलं व वैदेहीच्या दिशेने आला तोपर्यंत ती तशीच सुन्न उभी होती.. हॅलो मिस.... तरीही तिचं लक्ष नव्हते ..कदाचित मघाशी तिच्याबरोबर झालेल्या प्रकाराने ती काहीच बोलत नव्हती मग त्याने तिच्या हाताला पकडून हलवलं हॅलो मिस.... लक्ष कुठे आहे तुमचं ...अा आ ते ते...वैदेहीला काय बोलावं सुचतंच नव्हतं. Don't take tension. त्या मुलांना मी आता पोलिसांच्या हवाली केलयं. आता तुम्ही सुरक्षित आहात घाबरु नका मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी. हे सगळ इतकं अचानक घडलं की ती नाहीही बोलू शकली नाही कारण त्या प्रकाराने आधीच ती बिथरली होती त्यात मोबाईल ऑफ आणि बसही आली नाही म्हणून तिने त्याच्यासोबत जायचे ठरवले.


  त्याने त्याच्या गाडीचा एका बाजूचा दरवाजा उघडला व वैदेही ला आतमध्ये बसण्यास सांगितले..व तो दुसऱ्या साईडने बसला ..त्याने तिला पाणी देऊन शांत केलं..व गाडी स्टार्ट केली..तिने सांगितलेल्या पत्त्याच्या दिशेने गाडी जात होती म्हणून ती जरा relax झाली ..पण एवढ्या प्रवासात कोणीच काही बोललं नाही कारण ती घाबरलेली होती म्हणून त्यानेही जास्त काही विचारलं नाही. तिला घरी सुखरूप पोहचवणं इतकचं त्याच्या डोक्यात होतं..

   

जेव्हा ती बाहेर बघत होती तेव्हा त्या वाऱ्याने तिचे केस हळूवार उडत होते. तो ही मध्ये मध्ये तिच्याकडे बघत होता...पण मघासच्या त्या घाणेरड्या नजरा आणि ह्या नजरेत खूप फरक होता ..त्याच्या नजरेत तिच्याविषयीची काळजी अन् त्याला आवडलेली ती स्पष्ट दिसतं होतं पण त्याने हे तिला जाणवू दिले नाही..शेवटी त्याने तिच्या घराजवळ गाडी थांबवली..आणि तिला आवाज दिला मिस... तुमचं घर आलं. आ आ हो..thank you तुम्ही मला आज होणाऱ्या मोठ्या घटनेपासून वाचवलं. तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाही ती हात जोडून त्याला सांगत होती ... नाही अहो ठीक आहे.. माझ्याजागी दुसरं कोणीही असतं तर हेच केलं असतं... ती त्याला बोलू लागली. पण नव्हतं ना तिथं कुणी .....तुम्हीच वाचवलतं मला म्हणून खूप खूप आभार...चला माझ्या घरी ..ती त्याला बोलली..


पण उशीरहीे झाला होता.. त्यामुळे सॉरी आज नाही कधीतरी नक्की येईन. आज उशीर पण झालाय... ती बोलली ठीक आहे नीट जा ... व गाडीतून उतरत होती तेवढ्यात त्याने तिला आवाज दिला मिस तुमचं नाव विचारलंच नाही ...वैदेहीे कुलकर्णी तिने हात पुढे करत सांगितले आणि तुमचं... अभिजित देशमुख त्यानेही हात मिळवला आणि दोघे एकमेंकाकडे बघून हसले... ओके बाय म्हणत वैदेही गाडीतून खाली उतरली आणि पुन्हा एकदा thank you so much म्हणत एक गोड smile दिली..  अभिजीतने ही तिला बाय केलं व गाडी स्टार्ट करून निघून गेला... वैदेही त्याला हात हलवून बाय करत तिथेच उभी होती व हे अभिने गाडीच्या आरशातून पाहिलं आणि हसून निघुन गेला.. 


देवा तूच पाठवलं रे त्याला.. म्हणून ती देवाचे आभार मानत होती. जगात वाईट माणसे असली तरी चांगली माणसेही आहेत अभिसारखी. आ mm... अभिजीतचा अभि केव्हा झाला असं म्हणत तिने जीभ चावली व हसतच घरी गेली.. आज शीतल वाऱ्याची एक झुळूक वैदेहीच्या जीवनात एक वेगळाच आनंद देऊन गेली...


Rate this content
Log in