पत्रलेखन
पत्रलेखन
प्रति,
मा. कोरोना
भारतदेश
विषय : कोरोना व्हायरस राजा धुमाकूळ कमी करणेबाबत.
महाशय,
आपण सुरु केलेल्या धुमाकुळामुळे आज जगभरात हाहाकार माजला आहे.
राजा असे सर्वांना घाबरवून नको ना सोडू आता?
वृद्ध-अबालांना खूप त्रास होतोय रे, काही जणांना तर तू देवाज्ञा पण दिलीस. काय केले होते रे तुझे त्यांनी. तू कसा आलास? कुठून आलास? माणसांना किती छळतोस?सार्वजनिक ठिकाणे काही दिवसांसाठी बंद पाडलीस. शाळांचा नेमका महत्त्वाचा टप्पा होता रे!
p>
वार्षिक परीक्षेचा सराव चालू होता. मुलांचे विविध उपक्रम, प्रकल्प, निबंध वह्या यांची पूर्तता करून घेत होतो. याचा विचार काहीच नाही केलास रे तू.
येऊन धडकलास अचानक.
आता आलाच आहेस तर आम्ही सर्वच काळजी घेतोय.
तुला एक नम्र विनंती आहे की, तू भारतातून लगेचच बस्तान हलव. तू इथून गेलास की परतू नकोस हं... बघ आम्ही लस शोधून काढत आहोतच म्हणजे परत तुझा प्रवेश भारतात बंद होईल.
चल बाय लवकर बाहेर पड इथून. कोणाचेही नुकसान न करता बाहेर पड. माझ्या विनंतीला मान देऊन भारत सोडला तर मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही..
-एक त्रस्त नागरीक