प्रवास मध्ये बरंच काही अनुभव.
प्रवास मध्ये बरंच काही अनुभव.
एक विमान प्रवास असाही.... सराईतपणे विमानप्रवास करणारे आणि प्रासंगिक विमान प्रवासाची संधी मिळणारे असे दोन भिन्न वर्गीय प्रवासी विमानात स्थानापन्न झाले... नव्याने प्रथमच बसणारे प्रवासी कुतुहल मिश्रित नजरेने सर्वकाही टिपत होते तर सरावलेले शांतपणे न्युज पेपर, लँपटाप यामध्ये मग्न होते.. विमानाच्या दरवाजात एक नाजुक, नखरेल, गोरीगोमटी होस्टेस हात जोडुन गालात गोड हसुन वेलकम करीत होती... सगळं काही नाँर्मल होतं... बुकिंग नुसार सर्व स्थानापन्न झालेत ना लिस्ट नुसार चेकिंग ही सुरु होतं... शेवटी फायनल सुचना सुरू झाली... "सभी यात्रीओंको नमस्कार...इंडियन एअर लाईन कि तरफ से आपका दिलसे स्वागत है...आप अपना मोबाईल एअर मोडपर रखो, बेल्ट बांधो....ई. ई. तर शेवटी आपकी यात्रा और आपका दिन मंगलमय हो ऐसी कामना करते है। ईथपर्यंत सुचना पुर्ण होताच विमानाने धावपट्टीवरून ऊड्डान केले सुध्दा.... याच विमानात एक दाढीधारी बुढ्ढा ईसम, चेनसहीत लावलेल्या चष्म्यातून अख्खे विमान घारवट्या डोळ्याने निरखीत होता.. त्याच्या च शेजारच्या आसनावर ऊंच टोपी, काहीसे बावळे टपोरे डोळे, आणि बाहेर आलेले फारोळे दात आणि धड ना हुषार धड ना बावळा असा एक ईसम बसला होता...कदाचित तो त्या म्हातार्याचा मुलगा असावा... पान तंबाखू खाउन लाल झालेल्या झीजल्या दातांना ईचकावुन तो बुढ्ढा अतिशय हलक्या आवाजात त्या मुलाला काही सुचवत होता... याकडे अगदी कुणाचेही लक्ष नव्हते पण ओठावरील लीपस्टीक नव्याने ठिक करता करता होस्टेस ला काही तरी जाणवले... ईतक्यात तो तरूण वाँशरूमच्या बहाण्याने ऊठला... आता मात्र शंका जरा अधोरेखित झाली... होस्टेस ने आपल्या प्रसाधन केबीनमधुन कँप्टन पायलट यांना फोनवरून संभाव्य परिस्थिती बाबत सुचीत केले...( आप्त्कालीन परीस्थिती, सजगता, चौफेर द्रुष्टी, निर्णय क्षमता याबाबत प्रशिक्षण असावे तसे कदाचित....) ठरल्याप्रमाणे वाँशरूमध्ये 60मिनीटाचे टायमर बाँम्ब सेट करून तरूण परत आसनावर येऊन बसला... साधारण 80 प्रवासी यांची जींदगी फक्त 60 मिनीटे बाकी होती..तरुण जरा अस्वस्थ झाला कारण आज त्याची ही पहीलीच ट्राय होती... बुढ्ढा त्याला अतिशय हलक्या आवाजात समजावत होता डरो मत बेटा... आज तुम अल्लाह के प्यारे बंदे होंगे...अल्लाह तुम्हे ईतनी खुषी देंगे... जन्नत का दरवाजा तुम्हारे लिए सदा खुला रहेगा... और ईन सभी यात्रीओंको मरते समय जरा भी तकलीफ नही होंगी... क्योंकी अल्लाह खुद ऊन्हे लेने आयेगा..... आणि 10 च मिनीटात हे विमान दिल्लीत काही प्रवासी बदलण्यासाठी 20मिनिटे थांबणार होते.... नेमके तेव्हाच हे पितापुत्र विमान सोडणार होते.... प्लँननुसार सर्व परफेक्ट घडवुन आणले होते.... ईकडे होस्टेस च्या फोन नुसार अतिशय गुप्ततेने सर्व छानबीन झाली होती व पुढील रणनीती ठरली त्या नुसार कँप्टन प्रवासी कक्षात आले व सांगु लागले कि "ए बताते हुये हमें बहोत खेद है कुछ तांत्रिक बिगाड के कारणवश हम और देढ घंटेतक विमान लैन्ड नही कर सकते... और हमें खबर है कि किसीने हमारे प्लेन के वाँशरुममें टायमर सेट करके बाँम्ब भी रखा है...."हम करे तो क्या करे... अपने अपने भगवान, बीबी बच्चों को याद करो... अपने किये हुए अच्छे बुरे कर्मो को याद करो..और मरनेके लिए तैयार रहो..... काही तरी करा... काही तरी करा ...एकच आर्त कल्लोळ माजला...आपण प्रयत्न करणारच आहोत पण तरीही........ प्रवाशात कुणी बाँम्ब निकामी करण्यात जाणकार असेल तर प्लीज मदत करा.... असे अवाहन करण्यात आले... आता मात्र बुढ्ढा चांगलाच घाबरला.... ईतकावेळ जन्नत, अल्लाताला, बात करनेवाला मुलाला बाँम्ब निकामी करण्यासाठी ढोसु लागला... जाने भी दोना आब्बा, हमें भी तो लेने खुदा खुद आयैंगे ना... हमें भी तो जन्नत मिलेगी ना.... मुर्ख बच्चा..जल्दी ऊठो... बाँम्ब निकामी करो.... मै जो बोलता वो करो..जावो....हरी अप.... सर्वांनीच श्वास रोखून धरले.... अखेर तरुण उठला... वाँशरूमकडे गेला...आणि पाचच मीनीटात एखादे खेळणे सहजपणे हातात धरावे तसे निकामी निर्जीव बाँम्ब घेऊन कक्षात प्रवेशता झाला... ईतकावेळ रोखुन धरलेले श्वास, अश्रुंचे बांध, प्रियजनांच्या भेटीची आतुरता सर्वच अश्रुवाटे धावत सुटले... जन्म आणि पुनजन्माची किंमत मी काय वर्णावी... भान हरपुन प्रवासी तरुणाकडे धावले... अत्यानंदाने उचलुन घेतले.. म्हातार्यांनी काठी टेकत जवळ येऊन अलंबलं घेत कानशिलावरुन बोटे मोडली, प्रवाशातल्या तरुणीने हातावरील मेहेंदी दाखवत लाजेने चेहरा झाकला...तर एका आईने पै पै साठवुन लेकाच्या भेटीला निघालेय हे सांगितले.... हे सगळे ऐकून आपण किती पाप करणार होतो.... आपण खरचं लायक आहोत का या दुवा आणि कौतुकाला.... (फक्त बाँम्ब ब्लास्ट होईल तेव्हा आपण सुद्धा याच विमानातच असु या भितीपोटी आपण बाँम्ब निकामी केलाय... या एकाच विचाराने बाप लेक मनातुन खजील झाले होते..) आजच्या विजयाची खरी मानकरी एअर होस्टेस होती पण ती मात्र कुणाच्याही खिजगणतीतही नव्हती.
