पणती
पणती
मन मोकळं करण्यासाठी
पणती म्हणजे भू-मातेच्या उदरातील मातीच्या कणापासून बनविलेलं एक मातीच भांड. कुंभाराच्या चाकावर निर्जीव मातीच्या गोळल्यापासून बनवलेली वस्तू. कुंभार मातीच्या गोळ्यापासून छोत्या-मोठ्या वस्तू बनवतो. त्यातली ही एक चिमुकली निर्जीव वस्तू. ही मातीची असली तरी, ती अपार कष्ट करून, जीव ओतून बनवलेली असते. त्यावर एक प्रकारचे संस्कारच केलेले असतात.
तिन्हीसांजेला घरातल्या सासुरवासींणी स्रीया दरवाजा जवळ दाराच्या बाजूला, खिडकीत किंवा तुळशीवृन्दावना जवळ या पणतीत तेल वात लावून पेटवितात. अस म्हणतात तिन्हीसांजेची वेळ शुभ असते. घरात लक्ष्मी येण्याची ही वेळ, म्हणून तिला प्रकाशरुपी वाट दाखविली जाते. या पणतीच्या प्रकाशरूपाने लक्ष्मीचे स्वागत केले जाते. त्याच बरोबर घरातून दिवसभर बाहेर कष्ट करण्यासाठी गेलेली मंडळी घरी येण्याची सुद्धा हीच वेळ असते, म्हणून
यालाच दिवेलावणीची वेळ किंवा सांजवेळ झाली अस ही म्हणतात. वर्षभरात अनेक धार्मिकसण, उत्सवात. शुभ दिनी म्हणजे दसरा, दिवाळी, नाताळ, तसेच अनेक लहान-मोठ्या मंदिरामधून पणत्या पेटवून परिसर प्रकाशने उजळला जातो. मातीपासून बनविलेली पणती शुभ मानलीजाते. ही आकाराने लहान असते म्हणून पणती तिला म्हणतात, पण याच पणतीचा आकारा थोडा मोठा असेल तर, त्याला दिवा म्हणतात. देवाच्या मंदिरात किंवा घरच्या देव्हाऱ्याजवळ पणती आणि दिवा हे दोन्हीही तेवत असतात.त्यामुळे आपल्या मनाच पावित्र्य जपलं जात. त्यामुळे सभोवतालच वातावरण आणि परिसर प्रसन्न होतो असं म्हणतात.
ज्यामातीत आपण जन्माला येतो त्याच मातीची पणती आणि त्याच मातीचा आपण गणपतीही बनवितो.गणपतीच्या शेजारी अहोरात्र ही पणती आपण तेवत ठेवतो. आपली गाढ श्रद्धा असते. त्या देवाबद्दल आणि अहो-रात्र तेवत असणाऱ्या पणतीबद्दल. मनाच्या पावित्र्या बरोबर आपण आपसूकच त्या मातीच्या पणतीचही पावित्र्य जप्त असतो.
आपल्या घरातही असाच प्रकार असतो पण, काहीसा वेगळा विषय आहे.,पण या निमित्ताने तो इथ सांगावासा वाटतो. म्हणून सांगतो आहे. आपल्या घरातील एक उदाहरण आपण पाहू या. काय होत बघा.आपल्या आई-बापान लग्न केल, तसं आपलही झालं. आपल्याला दोन किंवा तीन मुलं झाली. त्यात जर पहिला मुलगा जन्माला आला तर, अलीकडच्या काळात काही जोडपी लगेचनसबंदी करतात. पूर्वी सोई सुविधा नव्हत्या. म्हणून एकेका जोडप्याला आठ दहा तरी मुल असायचीच. आता नवनवीन तंत्र विकसित झाली आणिमाणसाना कळू लागल. त्यामुळे आपोपाच मुलांची संख्या कमी झाली. किंवा मूल होण थांबलं, यातही मेख आहे बर का? जर मुलगी पहिली जन्माला आली तर, आणखी एक चान्स घेऊ या म्हणतात, त्यातूनही पुन्हा मुलगीच झाली तर, मुलगा होईल या आशेने आठ नऊ मुली होतात. आणि मानसिकता बदलत जाते. दुसर लग्न करण्याचा विचार सुरु होतो. कारण काय तर वंशाला दिवा पाहिजे ही मानसिकता. एका बाजूला पणती म्हणून तीच पावित्र्य जपायचं आणि दुसऱ्या बाजूला मुलगा हाच आपल्या वंशाचा दिवा आहे असे म्हणत, मुलींचा तिरस्कार करायचा. ही दुहेरी भूमिकेत माणस जगतात.
आपल्याला आई- बहीण, बायको हवी अस म्हणायचं, आणि स्वत:ला मुलगी झाली की, तिचा नाक डोळे मोडायचे. पण मुलींची संख्या वाढली की, मनोवृत्ती बदलते. मग मुलगा चोर दरोडे-खोर असला तरी चालेल. बापाच दिवाळ निघालं तरी हरकत नाही पण, वंशाला दिवा पाहिजे. मुली वंश वेल वाढवत नाहीत का? आई, बहीण, बायको एवढच नाही तर, हातात हात घालून फिरायला सुद्धा मैत्रीण पाहिजे...का?
आपली आई, बहीण, बायको या लहान असताना मुली नव्हत्या की,काय? मला एक कळत नाही. दिवा प्रकाश देतो, तसाच प्रकाश पणती ही देते ना? मग दोघात फरक का? एक मुलगी आणि बाकी चार मुलं असतीलतर, मुलीच गुणगान गातील. पण हेच गणित उलट झाल तर बोटे मोडतात. एका बाजूला स्री म्ह्णून आई-बहिणीचा आदर आणि देवतेची पूजा करतात. तिला आदिशक्ती म्हणतात. आणि त्याच आदिशक्तीच्या स्रीरुपी मुलीला गर्भातच मारतात. एकाच धरतीवर एकाच आई च्या पोटी जन्माला आलेली माणस अस दुहेरी वागतात याच दु:ख होत. जेवढा प्रकाश दिवा देतो. तेवढाच प्रकाश पणती देते. तिच्याही प्रकाशाने आसमंत उजळून निघतो. दोन्ही मानव निर्मित वस्तू आहेत. तरी त्यांच्या प्रती भाव, एक का नाही? मुलगी ही तुमच्याच प्रेमच प्रतिक आहे ना?
आपण स्वत: निर्माण केलेल्या मातीच्या निर्जीव पणतीला एवढा भाव देतो. देवाच्या देव्हारी ठेवतो. आणि आपल्याच रक्तामासाच्या गोळ्याला आपणच दुजा भाव का बर देतो. स्वत: आई म्हणविणारी आणि जन्म देणारी माता. स्वत
एक स्री असूनही या दुष्ट प्रथेत सामील होते. त्यावेळी तिची ममता कुठे असते. आणि आपण आई थोर तुझे उपकार!, आईविना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी, आईसारखे दुसर दैवत नाही. असे घसा ताणून ओरडतो कशासाठी.
ही पुरुषी जात, प्रसंगी मुलगी स्वत:च्या घरात जन्माला आल्या बरोबर लगेच कशी बदलते. बर हा पुरुषी दिवा जो मोठ्या नवस सायासाने जन्माला घातला, तो आम्हाला काय देतो. तर तोच म्हणे कुणा मुलीच्या प्रेमात पागल होतो. किंवा झाला. तर हाच एक दिवस आई-बापाला वृद्धाश्रमात ठेवून, बापाच डबोल घेवून पळून जातो, नाही तर, कुठ तरी परागदा होतो. म्हणजे पुन्हा आई-बाप मुलीकडे आश्रयाला, जिला हे गर्भातच मारू पाहत होते. तिच्याकडे येतात. ती ही एवढ समंजस असते की, सासू-सासरे, नवरा याचे नको नको ती बोलणी ऐकून घेत, आपल्या जन्म दात्यांचा सांभळ करते.त्यांना हव नको ते विचारते. काही अपवाद असतीलही पण, जास्तकरून तर असच दिसत. एवढ सर्व डोळ्याने पाहून अनुभव घेवूनही, घरातल्या स्री-पुरुष मंडळी सकट सर्व मुलगीरुपी पणतीला लोक का नाकारतात? हे कोड सजून उलगडलं नाही. यात स्री आणि स्री जातीच अपयश आहे, अस वाटत नाही का? अस म्हणाव वाटत. आपल्या जन्म दात्या आईची ममताही यात सामील होते, हे न समजणार कोड आहे.
अजूनही लोकानी चंद्र, मंगळ आणि विज्ञानाच्या कितीही गप्पा मारल्या तरी, आपली मानसिकता नर-मादि इतपतच सीमित आहे. आता पणत्यानी ज्वालामुखी होवून उठाव करावा. आईच्या ममतेन पेटून उठाव नवऱ्या मंडळी
विरुद्ध. अजून किती वस पुरुषांच्या बेगडी प्रेमाच्या मिठ्ठीत हुंदका गिळत जगणार आहात. आपल्याच आया, बहिणी आणि आपण स्वत: पणतीची वात सावरत नाही. तो पर्यंत अहंकारी पुरुष जातीला आणि विशेष करून जी स्वतःला स्री आई आजी म्हणवतात, त्या सुजाण मातेला पणतीचा प्रकाश दिसणार नाही.