Mrs. Smita Vijay Shinde

Others

4.3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

पैसा

पैसा

2 mins
293


माझ्या नवऱ्याला क्रिकेट खेळायची भारीच आवड शनिवार, रविवार आला की पहाटे सहा वाजताच उठून सोसायटीची गॅंग क्रिकेट ग्राउंडला पोहोचलीच म्हणून समजा. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे "पुण्यात उद्यापासून संचार बंदी आहे ग्राऊंडवर खेळायला जाऊ नका नाहीतर उगीच लालेलाल होऊन घरी याल" असे मिस्टरांना रात्री बजावून सांगितलं आणि झोपी गेले. सकाळी उठून बघते तर साहेब गायब! असो पण साधारण आठ-नऊची वेळ आणि सर्व क्रिकेट गॅंग दारात उभी बघून जरा हादरलेच, बघते तर काय साहेबांचा हात मोडला आणि गळ्यात अडकवलेला होता. त्यांचा केविलवाणा चेहरा बघून रागवावे की रडावे हे कळेनाच.


भरपूर लागलेलं होतं, मोठ ऑपरेशन झालं.मग काय आमच्या सासूबाई आणि मातोश्रींनी लगबगीने पुणे गाठले. एक दिवस बोलता बोलता माझ्या सासुबाई माझ्या अडीच वर्षाच्या लहान मुलाला म्हणू लागल्या मोठा होऊन काय होणार इंजिनीयर,डॉक्टर होणार की वकील? हे ऐकून हसावे की रडावे हे मला कळेनाच.अडीच वर्षाच्या मुलांना काय कळत हो?त्याचे खेळायचे दिवस हे,त्यात कळसच गाठला त्यांनी "तू लवकर मोठा हो आणि खूप पैसे आण,आता बाबांचा हात दुखतो तू कमवायला लाग लवकर"म्हणे.


आत्ताच कुठे खायला दात आलेल्या मुलाच्या पैसा मनात रुजवायला सुरुवात झाली एकदाची आणि आमचे चिरंजीव ही काही कमी नाही बाबांच्या पाकीटामधले पैसे पाहिजे असतात त्यांना, ते सोबत नेले की काका बनाना देतात म्हणे; घ्या आता पुढे काय बोलणार अजून? मग एक दिवस मीच घेतली तेल खडू ची पेटी आणि केल्या नोटा तयार रंगीबिरंगी तिस,चाळीस च्या ही.बाबांसोबत फिरायला जाताना चिरंजीव नोटा खिशात घालून नेतात आणि भाजीवाल्या काकांकडून बनाना, एप्पल मागतात. कौतुकाने हसून काकाही ते पैसे ठेवून घेतात. असो


पण प्रत्येकजण अगदी बोलता यायला लागल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत फक्त पैशाच्या मागे धावतो कारण पैसा हा जीवनात अत्यावश्यक आहे त्यापुढे सर्व व्यर्थ आहे हे त्याच्या मनात रुजवलं जातं, तो स्वतःच्या डोळ्यांनी बघतो,जाणतो आणि तेच आचरणात आणतो हे मात्र खरे.


Rate this content
Log in