मैत्री
मैत्री
मैत्रीची काही व्याख्याच नसते..मैत्रीवर बोलावे तेवढे थोडेच..संकटात एकेवेळी रक्ताचे नाते काढता पाय घेतात पण मैत्री नाही..मैत्री कुठलीही जात, धर्म, स्वभाव किंवा रंग रूपावरून ठरत नाही. अगदी झाडे, पशू-पक्षी, फुलांसोबतही मैत्रीच नातं घट्ट होऊ शकते.
हेच बघा ना माझ्या काही मैत्रिणींच मी उदाहरण देते त्यांच्या आणि माझ्या स्वभाव, विचार, वागण्यात कुठलंच साम्य नाही पण आमची मैत्री अगदी पारदर्शी आहे पाण्यासारखी..💧
"ती अगदीच सरळ, शांत आणि सुस्वभावी"😊
"मी खूपच चंचल, बोलकी आणि स्वभाव म्हणायचा झालाच तर बंदुकीची गोळी 🔫कधी सुटेल याचा भरवसाच नाही"
"ती नाती जपणारी, कधीही कोणाचा राग न मानणारी आणि आलाच एखाद्या वेळी तर तो शांततेत गिळनारी"
"माझं म्हणायचं झालंच तर अगदी नाकाच्या शेंड्यावर राग😡, मग कोणत्याही गोष्टीचा विचार न करता समोरच्याचा जागेवरच खरे खोटे करून फडशा पाडणारी"
आमच्यात एकही साम्य नाही पण कुठलीही अडचण आली, कुठलाही महत्त्वाच्या निर्णयावेळी एक फोन असतोच. मैत्री विचारांच्या तफावतीमुळे, जिभेवरच्या मिरची वरून किंवा स्वभावातला गोडव्यावरुन ठरत नसते..
एवढे मात्र खरे मनाच्या खोलव्यात उतरून मन ओळखता आले की मैत्री होते💕, मनं जुळली की मैत्री होते.
