SAMRUDDHI LANGADE

Others

4  

SAMRUDDHI LANGADE

Others

पानगळ

पानगळ

3 mins
136


      जवळपास ९ महिन्यांनी त्याचा मेसेज आला. भेटायचं का? तिने अर्थातच होकार दिला....   ठरल्या प्रमाणे ते त्यांच्या गावातल्या तळ्याजवळ भेटले. 

तो: आज खूप दिवसांनी भेटलो तर पुन्हा इथेच का? 

ती:- काही ठिकाणं मनाच्या गाभाऱ्यात घर करतात,  त्याच पैकी हे एक. बाकी कसा आहेस? 

तो:- छान. आणि तू? 

ती:- ठीक. आज अचानक भेटावं का वाटलं? 

तो:- ते फारसं महत्वाचं नाही. एक विचारू? 

ती:- हं

तो:- इतक्या दिवसात आठवण नाही अली का?

ती:- कॅम्पस मधून जॉब मिळाला. पुन्हा कधी इथे येणे होईल का नाही माहित नाही. म्हणून.....

   अक्षय आणि श्रेया म्हणजे कॉलेज मधली बेस्ट जोडी. श्रेयाच्या हॉस्टेलची वेळ सोडल्यास दोघे दिवसभर नेहमी सोबत असायचे. नोट्स share करण्यापासून ते कॅन्टीन मध्ये एक डिश share करण्यापर्यंत सगळंच तर त्यांनी वाटून घेतलेलं. बघणाऱ्याला जरी रोमिओ-जुलीयेट वाटले तरी ते खऱ्या अर्थाने मित्र होते. मैत्री कोणाशीही होऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते दोघे. एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवण्यापासून ते शिव्या देण्यापर्यंत दोघे सगळंच एखाद्या जिवलग मित्रांप्रमाणे करत.

  अक्षय हा वर्गात topper तर होताच शिवाय कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होता. श्रेया मात्र topper असली तरी शांत आणि अबोल होती. Topper आणि अक्षयची मैत्रीण ह्या पलीकडे कोणालाच तिच्याविषयी काहीच माहित नसायचं. 

        साधारण दहा महिन्यांपूर्वी अक्षयला एक मुलगी आवडली. दिशा....दिसायला सुरेख. ऑल राऊंडर असणारा अक्षय तिला देखील आवडला. पण ह्यामध्ये श्रेयाची घुसमट होऊ लागली. ह्याचं उत्तर तिला देखील सुरवातीला कळेना. दिशा तिला नकोशी वाटायची. कोणीतरी आपल्याकडची बहुमूल्य गोष्ट हिसकावून घेत असल्याचा भास व्हायचा. शक्य तितका स्वतःला कामात गुंतवून घेऊ लागली. 

     एकदा काही कारणाने दिशा कॉलेजला आली नव्हती. आठ दहा दिवसांनी जरी तिला अक्षयसोबत वेळ मिळाला असला तरी तिला अनेक वर्षांनी भेटल्यासारखं वाटलं. एक जवळचा मित्र म्हणून तिने त्याला सर्व काही सांगून टाकलं. 

   तो थोडासा विचारात पाडला आणि नन्तर काही न बोलताच उठून गेला. तिला अपराध्यासारखं वाटू लागलं. तिने शांतपणे विचार केला आणि तिचं तिलाच उत्तर सापडलं. पण अक्षय मात्र तिला टाळू का भेटू ह्या संभ्रमात होता. त्याने दिशाशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला आणि श्रेयाशी बोलणं टाळलं. आज अनेक माहिन्यांनन्तर ते भेटले.

 

ती:- तू त्या दिवशी ना बोलताच उठून गेला, माझ्या मनातला गुंता ना सोडवता.

तो:- हो कारण तू त्यावेळी माझ्या प्रेमात आहेस हे मला सांगणं कठीण होता.

ती:- हाच तर गैरसमज घेऊन तू माझ्याशी मैत्री तोडली. 

तो:- म्हणजे? 

ती:- आपल्यात आधीपासून मैत्री होती आणि आता हि आहेच. पण हे समजायला मला वेळ लागला. 

तो:- मला काहीही समजत नाहीये. थोडं नीट सांगशील का? 

ती:- मी खरंच तुझ्या प्रेमात होते का नाही सांगणं अवघड आहे पण तुझी खूप सवय झालेली. मी एकटी पडलेले आणि माझा एकमेव मित्र असणारा तू मात्र त्यावेळी सोबत नव्हता. त्यामुळे माझी जास्त घुसमट होऊ लागली. दिवसातील दहा बारा तास एकत्र असणारे आपण अचानक एक ताशी पूर्ण एकमेकांसोबत नव्हतो. तू त्या दिवशी उठून गेला तेव्हाच मला कळालं तू हा अर्थ काढला असणार आणि मला देखील तेच वाटलं. पण जेव्हा शांतपाने सगळं विचार केला तेव्हा कळालं आपल्यात फक्त मैत्री आहे. उगाच बॉलीवूडचे movie बघून किंवा वर्गातले चिडवतात त्यामुळेही कदाचित आपल्यात हा गैरसमज निर्माण झाला असावा. खरं सांगू? 

 खऱ्या आयुष्यात असं काहीही नसतं. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल ज्या भावना आहेत त्या जर निर्मळ असतील तर गैरसमज झाल्याने नाती तूटतात पण आपण त्या व्यक्तीबद्दल कधीच चुकीचा विचार करू शकत नाही. किंवा मला तरी असाच वाटतं. मी तुझ्याबद्दल कधीच असा विचार केला नव्हता आणि करणारही नाही. पण तू मैत्री तोडायला नको होती. 

    ए पण एक गोष्ट नक्की कळाली, तुझ्यासारखा मित्र खरंच मी खूप miss केला. 

तो:- मी पण तुला खूप मिस केलं. आणि खरंच मला माफ कर, माझ्या गैरसमजामुळे आपली मैत्री तुटली.

ती:- कधी कधी नात्याची आणि खास करून मैत्रीची किंमत कळायला पानगळीची गरज असते. नात्याचा वसंत पुन्हा बहारण्यासाठी...... 

पण ह्या काळात स्वतःला खूप सावरावं लागतं...ते मितवा मधलं गाणं नाही का


  मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे 

  पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे 

   येतील आता आपले ऋतू 

     बघ स्वप्न हेच खरे 

   पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्यांचे 

  पानगळ ही सोसताना सावर रे मना सावर रे,सावर रे....


Rate this content
Log in