Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

SHAILAJA WALAVALKAR

Others


3  

SHAILAJA WALAVALKAR

Others


मृत्योर्मा अमृतं गमय

मृत्योर्मा अमृतं गमय

4 mins 728 4 mins 728

माणसाचे मन समुद्रासारखे अथांग असते. मनात किती लहरी उठत असतात आणि किती क्षमत असतात याचा थांग लागत नाही. मानात जागृत होणारी प्रत्येक लाट किनारा शोधत असते. अशा मनाला कधी किनारा मिळतो तर कधी पैलतीर. आयुष्याच्या अशा एका वळणावर तिची भेट झाली, की नक्की मला तिचा मानसिक आधार हवा होता की तिला माझ्या सोबत असण्याची जास्त गरज वाटत होती हे नक्की सांगता येत नाही. माझे अस्तित्व अनेक प्रश्नांनी वेढलेले असताना तिची भेट ही माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेली.


अवंतिका, एक हुशार, कर्तुत्ववान स्त्री. अविनाशच्या जाण्याने सुरवातीला अक्षरश: कोलमडुन गेली होती. दोन मुलांचे शिक्षण, त्यांची स्वप्न पुर्ण करता करता आयुष्याची पन्नाशी केव्हां पार झाली ते तिला समजलेच नाही. दोन्ही मुलांनी भारता बाहेर आपले करीयर करण्याचा निर्णय घेतला तेव्हांच अवंतिकेला एका अनामिक एकटेपणाने वेढले होते. आयुष्याचा उत्तरार्ध मुलं, जावई, सुन, नातवंडे ह्याच्या संगतीत व्यतीत करावा असे तिला फार वाटले होते. म्हणुनच तिने शाळेतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. पण जेव्हां अमोल आणि सानिकाने आम्ही अमेरीकेत स्थायिक होणार असे सांगितले तेव्हां तिला खुप दु:ख झाले. तरी तिने कुठलेही आढेवेढे न घेता त्यांना होकार दिला होता. अमोल आणि सानिका दोघही आपल्या कुटूंबासमवेत अमेरीकेत स्थायिक झाले. अवंतिकेला एकटेपणाचे दु:खंं पेलवेना. एक दिवस घरी सकाळी चहा घेत असताना अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. तसे तर बरेच दिवस तिच्या पोटाच्या तक्रारी चालूच होत्या पण आज तिला मरण यातना होत होत्या. कसाबसा तोल सावरत, वेदनेला पेलत ती फोन पर्यंत पोहचली आणि मला तात्काळ बोलावून घेतले. मी तिच्या घरी गेले तेव्हांं ती अस्त्यावस्त बेशुध्द पडली होती. घराचा दरवाजा उघडून ठेवण्यासाठी दरवाजापर्यंत पोहचण्यासाठी तिला फार कष्ट पडले असतील हे तिक्या त्या अवस्थेला पाहून जाणवत होते.


अवंतिकाला घेऊन मी डॉ. मेमाणेंकडे (नाव बदलले आहे) गेली. त्यांनी तपासणी करून काही रिपोर्ट काढायला सांगितले. दुस-या दिवशी रिपोर्ट मिळणार होते म्हणून मी त्या दिवशी तिच्यासोबत तिच्याच घरी राहिले. संपुर्ण रात्र ती माझ्या समोर गतआयुष्याची उजळणी करत होती. त्यात तिचे विश्व हे अमोल आणि सानिका भोवतीच फिरत होते. मी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. " मुलं मोठी झाली की ते आपले आभाळ शोधतात. त्यांना त्यांचे मोकळे आभाळ द्यावे. मी तिला म्हणाले " अवंतिका, पक्षी काडी काडी जमा करून घरटे बांधतात. त्यात पिल्लांना जन्म देतात. आपल्या चोचीने दूरदूर जावून आणलेले अन्न भरवतात. पण जशी ती पिल्लंं मोठी होतात तेव्हां तिच पक्षिण आपल्या पिल्लांना आकाश मोकळे करून देते. कारण तो त्यांचा हक्क असतो आणि गरज ही." तिला हे कळत नव्हते वा पटत नव्हते असे नाही पण तरीही ती दुखावली गेली होती मुलांच्या कोरड्या वागणूकीमुळे.


दोन दिवसानी आलेल्या रिपोर्ट्ने मला एका वेगळ्याच अवंतिकेची ओळख करून दिली. अवंतिकाला जेव्हां कॅन्सर झाला आहे आणि तो शेवटच्या स्टेजमध्ये आहे हे कळले तेव्हां ती कितीतरी वेळ शांत होती. नंतर माझा हात घरला आणि मला विचारले, " म्रिगा, आज तु माझ्याबरोबर येशील?. आपण कोंडुरा(गोव्यातला एक सुंदर बिच) बिचवर जाऊ. मला तिचे हे बोलणे असंबंध वाटत होते. पण मी तिला हो म्हटले. आम्ही तिच्या घरी गेलो. मी आमच्या दोघांसाठी जेवण बनविले. तिला तिची औषधे दिली. संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही कोंडुरा बिचवर गेलो. सागरलाटांच्या मंद लहरी आसमंतात वेगळाच सूर उमटवत होत्या. अवंतिका लांब एक्टक बघत बसली होती. तिच्या चेह-यावर एक अनामिक शांतता पसरली होती.


मध्येच त्या सुरेल शांततेचा भंग करत ती बोलली, " म्रिग, आज मला सुरेश भटांच्या त्या ओळी आठवतात. "

मी तिला विचारले, "कुठल्या ग!"

ती म्हणाली, "सुरेश भटांनी किती खरे लिहिले आहे नाही,


"इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छ्ळले होते."


आपले समोर दिसणारे मरण बरेच काही शिकवून जात असते नाही का ग!," मला तिचे निरवानिरवीचे बोलणे सहन होत नव्हते. मी तिला विचारले, " अमोल आणि सानिकाला बोलवून घेऊ का?". त्यावर ती कोरडेपणाने मंद हसत म्हणाली, " नको, उडू देत त्यांना त्यांच्या आभाळी. " घरी परतल्यावर मी आणि अवंतिकाने कॉफी घेतली. गप्पा मारतामारताच तिचा डोळा लागला. मी कॉफिचे मग उचलून आत नेऊन ठेवले. दिवा मालवला. त्या रात्री तिला सोबत म्हणून तिच्याच घरीच राहीले. भल्या पहाटे मला अचानाक जाग आली. मी अवंतिकाच्या खोलीत जावून तिला बघितले तर ती गाढ झोपली होती. तिच्या ओठांवर मंद स्मित होते. मी आवाज न करता तिथून निघून गेले. सकाळी सहा वाजता उठून मी दोघांसाठी चहा केला. चहा घेऊन मी अवंंतिकाच्या खोलीत जाऊन तिला हाक मारली. एकदा, दोनदा पण ती उठेना. मग मी तिच्या कडे जाउन उठवायचा प्रयत्न केला पण ती उठेना. मी लगेच डॉक्टरनां फोन लावला. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी अवंतिका जाऊन चार तास झाले असे सांगितले. मी अवंतिके कडे पाहीले. अगदी आताही तिच्या चेह-यावर ते मंद स्मित विलसत होते. तिचा तो चेहरा पाहून त्या क्षणीही मला आरती प्रभू यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या -


" अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा

थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा"


आज तिच्या मनातल्या भावना परमेश्वराजवळ मी बोलून दाखवत होते " मृत्योर्मा अमृतं गमय "


O Lord ! Keep me not in ( the world of ) Mortality, but make me go towards the world of Immortality (of Self-realization).Rate this content
Log in