मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
मराठी हि आपली मातृभाषा आहे. या आपल्या भाषेला शेकडो वर्षाची समृद्ध परंपरा आहे. महाराष्ट्र हि थोर संतांची पवित्र भूमी मानली जाते. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज ,लोकमान्य टिळक,शाहू फुले आंबेडकर या महा पुरुषांची जन्म भूमी आणि कर्म भूमी आहे. संतांनी आपल्या वाङ्मयातून ,लेखनातून जनमाणसांना थोर शिकवणूक आणि प्रगल्भ ज्ञान दिले. हे सर्व मराठी जी आपली मातृभाषा आहे . त्याच बरोबर अनेक महापुरुषांची आत्मचरित्रे ,काव्य तसेच अनेक ग्रंथ ,या पासून मिळणारी ऊर्जा हि शेकडो वर्ष पासून आजपर्यंत टिकून आहे . ती आपल्या मराठी माणसांसाठी संकटांशी लढण्यासाठी एक संजीवनीच आहे . या आपल्या मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमानच आहे. वाढत्या जागतिकी करणाबरोबर स्पर्धेत टि
कून राहण्यासाठी इंग्रजी ला आपण आपल्या जीवनात योग्य स्थान दिले आहेच. परंतु आपली समृद्ध मराठी मातृभाषा टिकवण्यासाठी शासनाबरोबरच जनमाणसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाने मराठी शाळांना अनुदान तर दिले पाहिजेच त्याच बरोबर सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे . साहित्य संमेलन , व्याख्यानमाला , कविसंमेलन यान मार्फत मराठी भाषा समृद्ध तर होईलच परंतु त्याच बरोबर दर्जेदार मराठी चित्रपट व नाटक या माध्यमातून नवीन पिढीलाही मराठी भाषेचे महत्त्व नक्कीच कळेल. तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली , सर्व अबाल वृद्धांची लाडकी मराठी भाषा हि पुढील शेकडो वर्ष अशीच चिरंतर राहू दे आणि आपल्याला ज्ञान समृद्धी देऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.