दुष्काळापासून बोध घ्यावा
दुष्काळापासून बोध घ्यावा


आपल्या राज्यात दुष्काळाची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. आपण शेती प्रधान राज्यात राहतो . शेती हा आपल्या अर्थ व्यवस्थेचा कना आहे त्यामुळे
हि समस्या शासनालाही भेडसावत आहे. काही ठिकाणी शेतीसाठी पाणी तर दुर्लभच परंतु पिण्याच्या पाण्याचीही वाताहत होताना दिसत आहे . म्हणून दुष्काळापासून आपण धडा घेणे गरजेचे आहे. राज्याच्या काही ठिकाणी पाण्याची उपलभता चांगली असली तरी भविष्याच्या दृष्टीने वाढती लोकसंख्या व पाण्याचा वाढत वापर बगता त्याचे नियोजन व मर्यादित वापर यांकडे गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. दुष्काळाचे कारण शोधताना पाण्याचे प्रदूषण वाढती जंगल तोड आणि पाण्याची नासाडी या मानव निर्मित गंभीर चुका आहेत. तेव्हा या समस्यांवर योग्य अभ्यास व चिंतन करून तोडगा काढणे योग्य ठरेल . ज्या भागात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे तेथे शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे त्यांच्या आत्महत्त्या रोखणे त्यान्ना कर्जत सवलत देणे आणि त्याच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची सोय करणे हि शासनाची जबाबदारी आहे. दुष्काळी भागातील लोकांचे अश्रू पाहून आपले हि मन भारावून येत असेल तर आपण हि त्याना सर्व तो परी मदत करावी. दुष्काळी भागात पाण्याचा स्रोत वाढवणे योग्य साठवण आणि मर्यादित वापर यांसाठी पारंपरिक पध्द्ती बरोबरच आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तेव्हा दुष्काळाच्या नुसत्या बातम्या न वाचता आपले कर्तव्य समजून आपनही आपल्या सावलीचा विचार करता सकारात्मक राहावे .