महापुरुषांचे चरित्र
महापुरुषांचे चरित्र


आज आपला देश हा जगाच्या पाठी वरील एक युवा शक्ती म्हणून ओळखला जातो. आजच्या वर्तमानातील युवकच भविष्यातील देशाचे आधार स्तंभ आहेत .आपल्या राष्ट्राची युवा शक्ती हाच आपला पाय असतो. समाजातील वाढत्या समस्यांकडे युवकांनी आव्हान मानून त्यांना सामोरे जावे. बेरोजगारी, भ्रष्टाचार , दहशद वाद, व्यसनाधीनता, दुष्काळ या समस्यांना युवकांनी लढा देऊन खंबीर नेतृत्व निर्माण करावे. आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा आदर्श आहे. या महापुरुषांनी वेळोवेळी स्वतः पेक्षा देश हिताला महत्व देऊन समाजच्या कल्याणा साठी झगडून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. तेव्हा युवकांनी या महापुरुषांचे चरित्र अभ्यासावे. आज जागतिक पातळीवर युवकांच्या प्रयत्नांनी आपण एक महासत्ता म्हणून नक्कीच उदयास येऊ यात तीळ मात्र शंका नाही . आई वडिलांचा आदर गुरु बद्दल श्रद्धा देश बद्दल कर्तव्य असे अनेक पैलू त्यांच्या आत्मा चरित्रात अलघडतात.शिक्षनाने युवक परी पूर्ण व आत्मविश्वासू होऊन समाजासाठी झगडत राहावे हि महापुरुषांची विचार सरनि आहे. आपली भारतीय संस्कृती जी जगालाही हेवा वाटेल अशी आहे. परकीय आक्रमणा पासून आपली संस्कृती टिकून जगात एक वेगळी ओळख निर्माण करणे हे युवकांचे कर्तव्यच आहे. महाराट्राचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या असामान्य कर्तव्याने परकीय आक्रमणाला तोंड देऊन आपल्या देशाची जगात एक आदर्श स्वराज्य अशी ओळख निर्माण केली. तेव्हा युवकांनी त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा व आपले व्यक्ती महत्व घडवावे. भगातसिंग,राजगुरू यांनी प्राणाची पर्वा न करता इंग्रजांच्या जुलमी राजवटीला सडेतोड उत्तर देऊन स्वातंत्र मिळवून दिले. तेव्हा ते युवकांचे प्रेरणास्थान म्हणून आजही उल्लेख केला जातो . तेव्हा या लेखनातून महापुरुषांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रहित हे एकमात्र ध्येय समोर ठेऊन आपले जीवन हे समाज्यासमोर आदर्श म्हणून ठेवले. तेव्हा युवकांनी महापुरुषांचे चरित्र अभ्यासावे.