मनातला विचार
मनातला विचार
नमस्कार मंडळी..,कसे आहात
ठिकाण्यावर आहात ना..!!(अहो विश्वात..हो.)
कालच आपल्या राष्ट्राचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा झाला. शाळेत किलबिलाट नव्हता पण तिरंगा नभात डोलात फडकत दिसला. फडकणारा तिरंगा ध्वज पाहताना मनात विचार डोकावला. की,आपल्या या स्वातंत्र्य भारतेचा ध्वज फडकावा म्हणुन थोरांनी,वीरांनी त्यासाठी आहुती दिली. पण आज आपल्याला फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याचे किती गांभिर्य आहे. त्या तिरंग्याचा कोणी ही अवमान करते. त्या दिवशी सोशल मिडीयावर तिरंगा ध्वजाच्या रंगाचा मास्क विक्रीसाठी पाहिला. तो मास्क बनवणारा किती हुशार असेल ना...! त्याला वाटले असेल तो बनवतो शेंबुड पुसायचा रूमालच आहे. असे खुप आकल्लवान आहेत.
भारत भूमीच्या या तिरंग्यासाठी आपले जवान सिमेवर अहोराञ जागतात. त्यासाठी प्राण-प्रणाने लढतात. आपले ते जवान थंडी-वारा,पाऊस, ऊन या कशाची ही तमा न बाळगता घनदाट जंगलात कधी-कधी अन्न-पाण्याविना सतत तत्पर राहुन शञुवर नजर ठेवतात आणि आपल्या तिरंग्याला संभाळतात.
काही सुशिक्षित लोकांची तर खुप किव येते अशा महा थोरांना तर काय बोलावे. आपल्याला स्वातंत्र्य मिळुन आता ७४ वर्ष झाली तरी त्यांना आपला तिरंगा ध्वज कोणता हे ही साधे ओळखता येत नाही. ही दुर्दैव्याची बाब आहे असे वाटते. त्याहुन ही अतिशाहाणे म्हणजे जे आपले रक्षण करतात त्या जवानाना ते हुशार लोक उद्देशुन म्हणतात "तुझा काय गुडघ्यात मेंदु आहे का..?" असे बोलताना तो शुरांचा अपमान करतोय असे ही त्याला त्याच्या मनाला वाटत नाही.
आपण ज्या जवानामुळे घरी आनंदाने कुंटुंबा समवेत सण-उत्सव साजरे करतो त्या आपल्या जवानाना असे उद्देशुन बोलणे किती योग्य आहे. डोळे न लवता रात्र-दिवस ते आपले संरक्षण करतात त्यांच्यामुळे आपण घरात निवांत झोपतो हे थोडे लक्षात असु दया. आणि दररोज झोपताना त्यांचे थोडे स्मरण करूया. जबाबदारीने आपण आपली कर्तव्ये पार पाडू या.
आता जास्त पाल्हाळ लावत नाही..!कारण तसे आपण सर्व सुज्ञ आहोत जे अशिक्षिताना कळते ते सुज्ञाना कळावे. ही इच्छा...!!