"आमचे प्राण साहेब"
"आमचे प्राण साहेब"


माझ्या समोरील घटना आहे. की
आपण एका मुक्या प्राण्यावर माया केली की ते ही आपल्याला जीवापाड जीव लावते. आमच्या घरी दोन महिन्यापुर्वी एक मांजर आले होते त्याला आम्ही साहेब म्हणायचो ते आमच्या घरी आल्यापासुन आम्ही त्याच्याबरोबर खेळायचो. त्यांच्यामुळे मनोरंजन व्हायचे कामावरून घरी गेल्यावर त्याच्याशी थोडे खेळलो की दिवसभराचा थकवा जायचा आणि ते घरी असले की खुप छान वाटायचे.आमच्या घरातल्यांनी त्यांच्यावर खुप जीव लावलेला. मानवापेक्षा ही मुका प्राणी किती हुशार असतात.त्यांना कोणत्याही गोष्टीची अगोदरच चाहुल लागते. एक महिन्यापुर्वी आमच्या गेटच्या जवळ साप आला होता तर तेथे साहेब असल्याने तो साप लगेच नाल्यात असणार्या दगडी खाली शिरला.आणि हे साहेब त्यांच्यावर सर्पमिञ येई पर्यंत नजर ठेवुन बसले होते.शेवटी त्याला पकडल्यावरच घरात आले. साहेब घरी असले की आमच्या मातोश्री चा ही वेळ जायचा त्याला दुध, चपाती(पोळी) ते बाहेरी अंगणातील मातीत लोळायचे आणि घरात आले की पहिल्यांदा त्याला पुसायला लागायचे.घरातील सर्वांनाच लळा लावलेला त्याला आम्ही आमच्या गावाला ही घेऊन गेलो होतो. तिकडे ही ते एक दिवस राहिले होते. त्याने कधी ही चोरून दुध प्याले नाही किंवा आमचा ओठा चढले नाही.बाहेरून खुप दमुन आले की ते पाणी प्यायचे . ते घरात असले की आम्ही दिवस-राञ कधीच दरवाजा लावायचो नाही.त्याला बाहेर जावे लागे तेव्हा ते जायाचे. दिवसभर पलंगावर (बेड) तर राञी आमच्याबरोबर (कुशीत) झोपायचे . आम्हाला खुप छान वाटायचे त्यांच्याबरोबर मजा-मस्ती करायला किंवा झोपायला. पण आज दोन - तीन दिवस झाले ते घरी आले नाही .आम्ही त्याला खुप शोधले पण आम्हाला ते सापडले नाही . मला आमच्या घरातल्यांना खुप दुःख होत आहे. ते जाण्याच्या अगोदर मी पाहिले होते की ते रडताना, त्यावेळी आमचे भाऊ यांनी त्यांचे डोळे ही पुसले होते. त्यानंतर ही आम्हाला ते दोन-तीन वेळा त्यांच्या डोळ्यातुन आंश्रु ओघळताना दिसले होते पण त्यावेळी आमच्या लक्षात आले नाही. ते गेल्यावर वाटते त्याला अगोदरच माहित असणार की येथुन आपण जाणार आहे.म्हणुन तर ते रडले होते असे मला माझ्या मनाला सतत वाटते आहे. मनातील भावना व्यक्त करताना ही खुप दुःख होते आहे. हे लिहताना ही डोळे भरून आले खुप आठवण येते. मुका जीव होता पण खुप लळा लावुन गेला. जीवंत असे पर्यंत आम्ही विसरू शकत नाही त्या आमच्या साहेबांना...!