arvind kulkarni

Others

2  

arvind kulkarni

Others

मातृसुरक्षा

मातृसुरक्षा

2 mins
55


दिनांक १० जुलै २००५ पासून जागतिक आरोग्य संघटनेने च्या सुचनेनुसार "मातृ सुरक्षा दिन "  जगभर पाळला जातो .  गरोदर माता व स्तनदा माता यांची काळजी कशी घ्यावी या बद्दल आरोग्य शिक्षण दिले जाते . मातांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जातात .  

 तसे पाहिले तर  भारतीय स्त्रियां मधे कुमारवाया पासूनच रक्तातील एच . बी .(लोहाचे) प्रमाण कमी असते . त्यांची शालेय जीवना पासूनच शारीरिक तपासणी करुन रक्तातील लोहाचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी आहाराचे मार्गदर्शन व लोहयुक्त गोळ्या त्यांना देऊन  त्यांची देखभाल केली पाहिजे .  

 गरोदरपणात रक्तदाब वाढणे , शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे , अनेमिया ईत्यादी अजार होण्याचा संभव असतो . त्या साठी शासकीय दवाखान्यात किंवा खाजगी मॅटर्निटी होम मधे  गरोदर पणातील तिसर्या महिन्यात नोंद करुन तज्ञ डॉक्टर कडून नियमित तपासणी करुन घ्यायला हवी . 

  ताजा व सकस आहार घ्यायला हवा .   विविध प्रकारच्या पालेभाज्या , फळे यांचा आहारात समावेश करावा . भरपूर विश्रांती व अवश्यक व्यायाम , योगा तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा . 

   सुरक्षित मातृत्वा साठी दोन मुलात कमीत कमी तीन वर्षाचे अंतर असावे . मुलगाच पाहिजे हा हव्यास केला तर  तीन चार मुलीच होतात व  मातेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते . 

  वय वर्ष १८ नंतर विवाह केला तर मुलींच्या सर्व अवयवांची वाढ पुर्ण झालेली असते त्या मुळे बाळंतपणात त्रास न होता ते सुलभ होते . कमी वयात लग्न झाले आणि लवकर गरोदरपण आले तर अनेक गुंतागुंतीच्या तक्रारी निर्माण होतात प्रसंगी माते च्या व बाळाच्या जिवावर बेतले जाण्याचा संभव असतो .

     मातामृत्यू रोखायचे असेल तर ,  गरोदरपणापासून , बाळंतपणात पर्यंत सर्व उपचार शासकीय रुग्णालयात करावे . शासना तर्फे अनेक सोयी सुविधा गरोदर माता व स्तनदा मातांसाठी उपलब्ध आहेत . 

         सुरक्षित मातृत्व हे राष्ट्राचे भुषण आहे . 


Rate this content
Log in