arvind kulkarni

Others

3  

arvind kulkarni

Others

दाग अच्छे होते है

दाग अच्छे होते है

4 mins
254


मी सातवी पास होऊन आठवीला गेले तेव्हाची गोष्ट ! शनिवार चा दिवस होता , शाळाही अर्धा दिवसच होती. सकाळची शाळा असल्यामुळे एव्हाना मी आवरायला हवे होते पण आज मला शाळेत जायचाच मुळी कंटाळा आला होता.डोके जड पडले होते, थोडे पोटात ही दुखत होते .इतक्यात रोजच्या प्रमाणे माझी मैत्रीण आशा मला बोलावून आली. " सुमे , आटोपलं का ग तुझं ? चल लवकर उशीर होतोय शाळेला.माहीत नाही का , आज लवकर भरते शाळा . अशी बडबड करत आशा माझ्या घरात आली आणि मला शाळेत जाण्यासाठी घाई करु लागली.तिच्या बडबडीला वैतागून मग मी ही उठले , दप्तर घेतले आणि आम्ही मिळून शाळेत गेलो.


       प्रार्थना झाली , आम्ही वर्गात आलो. आमच्या क्लासटीचर देशपांडे बाई मराठी शिकवायच्या . त्यांनी आज कवी माधव ज्युलियन यांची कविता शिकवायला घेतली होती. प्रेमास्वरुप आई ...... माझी खूप आवडती कविता.पण माझं आज तिकडे लक्ष चे लागत नव्हतं . माझ्या पोटात जास्तच दुखु लागलं . माझी एकसारखी चूळबूळ सुरू होती.कधी एकदा शाळा सुटेल आणि मी घरी जाईल असे मला झाले होते. दोन पिरियड झाले आणि पंधरा मिनिटांची मधली सुट्टी झाली , तशी मी बाथरुमला पळाले .परकाला पडलेला रक्ताचा लाल डाग पाहून तर मी खूपच घाबरले .अरे ऽऽ देवा ऽऽ हे काय झाले ? तो रक्ताचा डाग पाहून माझ्या घशाला कोरड पडली , पायात गोळे आले ,मला काहीच सुचेना , वर्गात जाऊन गुपचूप दप्तराची पिशवी घेतली , आशाला माझ्या मैत्रीणीला तो डाग दाखवला , ती पण घाबरली. परकरावरचा डाग कुणाला दिसू नये अशी दप्तरातील पिशवी धरली आणि आम्ही दोघींनी ही शाळेतून सु बाल्या केला . मी माझ्या घरी आले तेव्हा आई धुने वाळत घालीत होती.दप्तर फेकून दिले आणि आई कडे धावले व तिला घट्ट मिठी मारुन धाय मोकलून रडू लागले .आई विचारच होती , अग सुमे काय झालं ? कोणी काही बोललं का ? शाळेत काही घडलं का ? पण मला बोलताच येईना .तितक्यात आमची आज्जी आली. तिने मला आणि आई ला पाहिलं .माझ्या परकरावरचा मागच्या बाजूला पडलेला लाल रक्ताचा डाग पाहिला आणि आई ला म्हणाली " काय व्हायचंय कप्पाळ ! पोरीला न्हाऊन आलंय , तो बघ परकरावचा डाग ! अन् काय ग एक टवळे , शीवलीस का आईला ? आता जा न्हानीत अन अंघोळ्या करा . आजीने मला एक फाटक्या पोत्याचा तुकडा दिला आणि जा ग संपले , बस तिकडं कोपर्यात म्हणाली .मी त्या फाटक्या पोत्यावर पोटात पाय घालून त्या पोटदुखी च्या वेदना सोसत पडून राहिले.आमची आजी फार कडक सोवळ्यातली होती . तिला शिवाशीव अजिबात चालत नसे. आई ने जुन्या साड्यांच्या चार पाच चिंध्या लांबूनच माझ्या अंगावर फेकल्या आणि बाथरुम कडे बोट दाखवले.

         झाले , तीन दिवस मला अंघोळ नाही की हातपाय धुणे नाही .जेवायला सुद्धा ताज अन्न देत नसत . कालची शिळी भाकरी आणि चटणी ! आधीच पोटदुखी आणि वरुन ही चटणी भाकर , पण बोलायची सोय नव्हती . जणू मी काही मोठ्ठा गुन्हा केलाय असेच घरातील सर्व जण माझ्याकडे पाहात होते. एखाद्या चोराला धरुन आणल्या सारखे अंगचोरुन मी त्या कोपर्यात बसायचे.

     चौथ्या दिवशी आई ने स्वच्छ डोक्यावरून न्हाऊ घातले .नवे कपडे नेसायला दिले .शाळेची वेळ होत आली होती . मी आवराआवर सुरू केली तशी आमच्या आजीने माझ्या हातातली दप्तरातील पिशवी हिसकावून घेतली , मला म्हणाली " सुमे , झाली तेवढी शाळा पुरे झाली. आजपासून तुझी शाळा बंद ! ऐकलं का ग ये राधे , (राधा माझी आई) पोरगी वाशी झाली आता वयात आली , तिच्या लग्नाचं बघायला सांग तुझ्या नवर्याला.

         झाले , एक डाग काय पडला माझ्या परकराला ,त्याने माझी शाळाच बंद केली. 

 रात्री पलीकडच्या खोलीत आई बाबा बराच वेळ हळूहळू काहीतरी बोलत होते. आठ दिवसातच मला पाहायला पाहूणे आले . कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला . तिकडच्यांना मी पसंत पडले आणि बाबांनी माझे लग्न ठरवले.

   

      एक महिन्यात मी लग्न होऊन सासरी राहावयास आले . सासरी आल्यावर काही दिवसांनी मला पाळी आली . नविन माणसे , नविन ठिकाण , पाळीचे कोणाला सांगावे ? आई पण नाही मदतीला. काय करावे ? माझी चलबिचल सुरू होती पण माझी ही अवस्था माझ्या सासूबाई नी हेरली.मला पाळीसंबधी विचारले व लगेच आमची नाकाबंदी केली . एक फाटकी सतरंजी माझ्या अंगावर भिरकावली व आमची रवानगी एका अंधार्या अडगळीच्या खोलीत केली. मला तिथे जेवन पाणी दुरुनच दिले जायचे . पाणी पिऊन झाले की तांब्या पालथा घालायला सांगितले जायचे.


    असे होते आमचे दिवस . आठवले की हसू ही येते आणि वाईट ही वाटते.


   आता माझी मुलगी ही आठवीलाच आहे.एकेदिवशी ती ही घाबरीघुबरी होऊन शाळेतून घरी आली .मला पाहून रडू लागली .मला बाजूला घेऊन तीने तो लाल रक्ताचा डाग मला दाखवला .मी तिला जवळ घेऊन मायेने तिच्या तोंडावरुन हात फिरवला .तिला सर्व काही समजावून सांगितले.निसर्गाने स्त्रियांना दिलेली ही एक अमोल देणगी आहे हे तिला पटवून दिले .तिच्या मनात असलेली अनामिक भीती व गैरसमज दूर केले .तिला सॅनिटरी पॅड देऊन ते कसे वापरायचे ते सांगितले.स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. मला पडलेल्या पहिल्या डागाची ही सारी हकीकत सांगितली . आणि तिला दुसर्या दिवशी शाळेत पिटाळले . तिची कबड्डीची टुर्नामेंट चालू होती . मी तिला थोडीच घरी बसू देणार होते ? 


   आणि तो डाग ? त्या डागाबद्दल माझी मुलगी मला म्हणते कशी ? 

" माॅ, तेरे उस दाग से मेरा ए दाग बहोत अच्छा है " 


     " दाग अच्छे होते है " 


  


Rate this content
Log in