Trupti Koshti

Others

3  

Trupti Koshti

Others

माझ्या साडीची व्यथा

माझ्या साडीची व्यथा

5 mins
447


       रीमा .... चल अग... किती उशीर ... हो आणि आत्ताच सांगतोय आपण एकाच दुकानात जाणार आहोत त्यामुळे मला सारख सारख चला दुसरीकडे बघू , असे तर अजिबात म्हणायचे नाही ... मी काही तुला दुसऱ्या दुकानात नेणार नाहीये .... त्यामुळे एकाच दुकानात साडी पसंत करायची , हो आणि एकदाच घे काय ते पुन्हा घरी गेल्यावर म्हणू नको कि हिच्या पेक्षा ती दुसरी छान होती , मी काय पुन्हा पुन्हा तुला बदलण्यासाठी घेऊन जाणार नाहीये आणि पटकन आवरायच जास्त वेळ लावायचा नाही .... झाल ... घरातून निघतानाच अनुरागने रीमा ला चांगल भल मोठ लेक्चर दिल होत ... कारण त्याला माहिती होत ... हिला साडी खरेदी म्हटले कि जणू हिचा आनंद गगनात मावत नाही आणि उत्साह तर विचारूच नका ...

        रीमा ... खुप सुंदर , अगदी स्वप्नातील परीच होती अनुरागच्या ... अनुराग पण तसा कमी नव्हता .... तो ही खुप छान होता .... दोघेही कॉलेज मधले मित्र होते आणि ही मैत्री कधी प्रेमात बदलली , हे त्या दोघांनाही समजले नाही आणि दोघांनी घरच्यांच्या संमत्ती ने लग्न केले . 

             आता साडी खरेदी म्हटले कि तुम्हांला माहितीच आहे कि आम्हां बायकांना कित्ती आवडते . नुसते दुकानात जायचे म्हटले तरी आम्हाला खुप आनंद होतो . साडी म्हणजे जीव कि प्राण आहे आमचा , मग भलेही आम्ही त्या कपाटात ठेवू किंवा कधीतरीच घालणार असू ... पण साडी हवीच प्रत्येक सणाला ... आता दिवाळी येणार होणार होती ... मग काय मोठ्ठी खरेदी ... कसेबसे अनुराग ला तयार केले होते साडी खरेदी करायला सोबत जायचे ... कारण पुरुषांना हे मोठे संकट वाटते ... आणि फारसा काही यात रस नसतोच ... पण रीमा आणि अनुराग दोघेही आज दुपारीच जाणार होते खरेदीला त्यामुळे रीमाने सगळे अनुरागच्या आवडीचे पदार्थ बनवले होते ... घ्या म्हणजे मस्का लावायला इथूनच सुरुवात होती

           अखेर दोघेही साडीच्या तीन मजली शोरुम मधे गेले . रीमाला एव्हड्या आता साडी खरेदी म्हटले कि तुम्हांला माहितीच आहे कि आम्हां बायकांना कित्ती आवडते . नुसते दुकानात जायचे म्हटले तरी आम्हाला खुप आनंद होतो . साड्यांचे ढिगारे बघितले तरी काही लवकर पसंत पडेना ... पण तरीही तिने ७ ... ८ साड्या बाजूला काढून ठेवल्या होत्या ... तुम्हांला तर माहितीच आहे कि आम्हां बायकांना एक साडी कधी पसंत पडते का .. गेलो तर निदान ४ ... ५ साड्या घेतल्याशिवाय आम्ही काय तिकडून हलत नाही ... त्यामुळे रीमाला तर साड्या तश्या खुप पसंत होत्या , कळत नव्हते कि कोणती घेऊ आणि कोणती बाजूला ठेवू ... कारण सगळ्याच खुप हेवी आणि भारीतल्या साड्या होत्या ...प्युअर सिल्क , कांजीवरम , डायमंड वर्क , बांधणी , पेशवाई ... अश्या बऱ्याच साड्या काढल्या होत्या ... अनुरागला तर घामच फुटला तिच्या समोरचा ढिगारा पाहून ... अनुरागने तिला विचारले कि आपण एव्हड्या साड्या घेणार आहोत का , एव्हड्या नको फक्त २ घे , कारण आधीच तुझ्या कपाटात त्यांना जागा नाहीये ठेवायला आणि तुझ्याकडे भरपूर साड्या आहेत ... हे ऐकून तर रीमाला खुप चीड आली ... तीने लगेच सांगितले कि अनू मला आवडल्या आहेत रे ह्या आणि मला हव्या आहेत सगळ्या ... अनुराग एक एक साडी बघत होता आणि रीमाला सांगितले कि तुझ्याकडे ह्या रंगाची साडी आहे तर मग तेच तेच का घेतेय ही राहू दे दुसरी बघू ... असे करून अनुरागने त्या ७ ... ८ साड्यांमधून फक्त ४ साड्या निवडल्या आणि उठू लागला ... पण रीमा काय हलायच नाव घेइना , आता काय झाले अनुराग बोलला ... अनू ! मला ती पण आवडलीये रे किती छान आहे ती आणि रंग ही खुप छान आहे मला पाहिजे ती .... बरं घे असे म्हणून अनूरागने ती पण साडी उचलली आणि बील करायला खाली आले ... तरी पण रीमाचे लक्ष अजून त्या ढिगार्याकडे च होते ... अनूराग ओरडला तिला तरी तिने बघितले नाही कारण ती बाजूच्या साड्यांकडे बघत बघतच खाली येत होती ...

             बील झाले रीमा आणि अनुराग आता घरी यायला निघाले . दोघेही दमले होते कारण रीमाने ४ तास त्या दुकानात घालवले होते . मग गाडीत बसतानाच रीमा अनू ला बोलली कि , आपण आता बाहेरूनच खाऊन जाऊया ... कारण मी आता दमलेय खुप ... हो का राणी सरकार दमल्या तर असणारच , कारण एव्हड्या साड्या खरेदी करायच्या आणि पसंत करायचे म्हणजे थोडेच काम झाले हे ... अनुराग तिला चिडवायच्या सुरात बोलत होता ... पण रीमाने त्याकडे लक्ष दिले नाही . दोघेही मस्त हॉटेल मध्ये जेवून निघाले आणि घरी जायला त्यांना रात्र झाली होती .. गेल्याबरोबर रीमाने सगळ्या साडीच्या पिशव्या तिथेच हॉल मधे टेकवल्या आणि दोघेही झोपी गेले ...

            दुसऱ्या दिवशी दुपारी रीमाने सगळ्या साड्या एक एक करून घालून बघितल्या खुप छान दिसत होत्या तिच्यावर पण , त्यात एक तिला बदलावीशी वाटत होती कारण तिच्याकडे आधीच त्या रंगाच्या २ साड्या होत्या ... हे तिला अनुरागने आधीच सांगितले होते पण तीने तेव्हा काही त्याचे ऐकले नव्हते . पण आता बदलायला जायचे म्हणजे पुन्हा अनुरागचे ऐकुन घ्यावे लागणार . अनुराग ला तिने दुपारी ऑफिस मधे असताना फोन केला आणि सांगितले कि आज लवकर घरी या ... तेव्हाच अनुराग समजून गेला कि बाई साहेबांना काहीतरी काम आहे किंवा मग कालची खरेदी अपूर्ण राहिली असणार ... अनुरागने हो म्हणून फोन ठेवून दिला आणि ऑफिसमधून लवकर निघाला . रीमा आवरूनच बसली होती आणि जी साडी बदलायची ती पिशवीत ठेवून तिने पुढे आणून ठेवली होती . अनुरागने आल्या आल्या ती पिशवी बघितली आणि समजून गेला कि आता पुन्हा त्या दुकानात किमान २ तास तरी सुटका नाही . मग काय जावे तर लागणारच होते ... अनुराग फ्रेश झाला आणि रीमाने त्याला कॉफी मग दिला ... दोघेही थोड्यावेळात निघाले आणि पुन्हा रीमा त्या दुकानात गेल्याबरोबर साड्यांच्या शोधात लागली . खुप साऱ्या साड्या बघितल्या शेवटी रीमाने एक साडी पसंत केली ... निळ्या रंगाची लाल काठ असलेली बुट्टेदार अशी सिल्क ची साडी होती आणि रीमावर खुप छान दिसली असती . तरीही रीमा अजून त्यात बघतच होती , कि अजून काही आवडतेय का ... पण अनुरागने पुन्हा कालच्या ४ साड्यांची आठवण करून दिली तशी रीमा भानावर आली आणि बास्स म्हटली .

       अनुराग आणि रीमा बील करायला खाली आले आणि बील करताना अनुरागने मस्करीत रीमा ला बोलले कि चला राणी सरकार " आता निघायचे का "... !!! चला आता तरी घरी कि साडीचे दुकान काढायचा विचार आहे ... कि अजून खरेदी बाकी आहे तुमची ...मग रीमा लगेच नाही बोलली आणि चला आता घरी जाऊ म्हटली ... तसे दोघेही हसले आणि घराकडे निघाले ...

      खरचं साडी म्हणजे आम्हां बायकांना वेड च लागते किती घेऊ किती नको असे होते . आणि एकदा बदलणे तर होतेच कारण ती बदलल्याशिवाय आम्हांला चैन च पडत नाही ना त्यामुळे किमान दोनदा तरी दुकानात जाणे होते . आता सध्या माझ्या कपाटात किमान ३०० च्या पुढे साड्या असतील , पण तरीही नवीन साडीचा मोह काही आवरत नाही ...


टिप : वर्षातून किमान दोनदा तरी बायकोला नवीन साडी घ्या . नवरा बायकोत जर भांडण झाले असेल किंवा बायको चिडली असेल तर नवऱ्याने फक्त बायकोसाठी एक छानशी साडी आणि गजरा घेऊन जा घरी जाताना ... मग बघा कित्ती खुश होते तुमची बायको आणि भांडण कशावरून झाले होते हे पण लगेच विसरेल .Rate this content
Log in