माझी डायरी
माझी डायरी
आज जाग पहाटेच आली. दिवसभराचे संकल्पही खूप ठरविले. पण वेळेवर काहीच घडत नाही माझ्याने हे मात्र खरंच होतं. मी शाळेचे रेकाॅर्ड बुक लिहीत बसले. पण काम इतकं की पूर्णच होईना... शेवटी दिलं ठेवुन की दुपारी करु म्हणून... आता स्वयंपाकाला लागायचं होतं. पण मोबाईल व मिळवलेली त्या दिवसाची प्रमाणपत्रं बघण्यात वेळ गेला. इतका अभिमान वाटत होता स्वतःचा स्वतःला... पण बाकीच्यांना हे सुख कळणारंच नव्हते. मसुर डाळ शिजविली व चपात्या करुन ठेवल्या. पाणी आलं ते ही अवेळी... मग मलाच भरावं लागणार होतं. आता मी घरी आहे ना ! मग कुणी काम करायला बघतच नाही.
शेवटी सर्व कामं आटोपली. मुड बनला पिक्चर बघायचा. मला मराठी भावनिक पिच्चर खुप आवडतात नवीन मुवी होती. नात्याची गुंतागुंत वगैरे... पण मराठी मुव्ही कमालच असतात... खूप खूप रडले पाहताना... मुलगा म्हणाला हे काय आता ग्लास ठेवू का मम्मी तुझ्याजवळ... पण खरंच भावनिकच होता पिक्चर... अजयचं सारखं रीममध्ये येणं जाणं चा
लू होतं. त्याला जरा ताप होता बारीक... आणि तो जाम टेन्शनमध्ये..."म्हणाला मी प्रार्थना करतोय की हे जागतिक संकट टळू दे." आम्ही खूप हसलो मग... कारण त्याच्या मित्राचा फोन आलेला व हा त्याला खूप दिलासा देतोय फोनवर... काळजी करू नको दवाखान्यात जा. औषध घे बरंच वाटेल...
जाय मग डेरींगनं दवाखान्यात... आम्ही पुन्हा हसलो... मग मी म्हटलंच दुसर्यांना धीर देता आणि स्वतः तर ताण घेवून बसले आहात... मग मुलांना माझ्या प्रेगन्सीच्या वेळेची एक हास्यकथा सांगितली. पर्णवी पोटात असताना माझ्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात येणार होते. अजय माझ्या जवळ असावेत असे डॉक्टरांना वाटत होते. मोरल सपोर्टसाठी असावेत मिस्टर जवळ... डॉक्टरांनी जसे इंजेक्शन माझ्या हाताला लावले. अजयलाच चक्कर आली. पाहतो तर साहेब भोवळ येऊन जमिनीवर... मला सोडून सर्वच लोक अजयला सावरण्यासाठी धावले...शेवटी डॉक्टर म्हणाले स्ट्रॉंग कोण तुमच्यामध्ये... आणि मी बोललेच नाही...