कोरोना सुट्टया
कोरोना सुट्टया


सुट्या मिळणार या विचाराने ईतके खुश झालो आम्ही. कारण गेली वीस वर्ष मी अव्याहत पणे धावत आहोत .शाळेची हीसुटी पर्वणी होती .पण कोरोना आजाराचा हा कहर होता.खुप दिवसानी मी माझे शाळा कॉलेजमधील अल्बम बाहेर काढले .खूप दिवसांनी नवर्यालाही सुटटया होत्या .कधी कधी अस होतच, कि सोबत राहुन राहून नात बोअर होऊन जात. आपण कुणावर किती प्रेम करत होतो कळत नाही आणि धावपळीच्या जगात आपण हरवुन जातो.आज कॉलेजमधील सर्व सर्व मुलमुली आठवले ,तो क्लास ते भूगोल डिपार्टमेन्ट आणि कॉलेजची बाग....! बापरे इतके वर्ष झाली तरी कॉलेज तसच बहरत असेल....पण मीच फक्त नाही.तु आठवलाच आज ....आपली भेट पहीली लोकमत युवामंच च्या महाविदयालयीन प्रतिनिधी साठी मी इंटरव्हूव साठी आली होती . तु आश्विन तुमचे काहीतरी इंग्रजीत पोपटपंची सूरु होती . मी कुमार सराच्या कँबीन मध्ये गेले .तेथे चार जण आणखी होते माझ्यावर प्रश्नाची बरसात झाली पण माझ्या कवितेची डायरी मी सरापुढे ठेवली .व सिलेक्ट झाली म्हणुन माझे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात भेट व्हायची ....प्रेमात नव्हतो आपण ....पण एक दिवस तु घरी आलास एकटा.. आज कूणीही मित्र नव्हता सोबत...आणि तु प्रपोझ केलेस. तु मला माझ्यापेक्षाही जास्त आवडतेस.आणि त्या क्षणी मी खुप आनंदले होते. कारण त्या क्षणाची मी देखील वाट पाहात होते आणि मी तुला होकार भरला होता ...आज तु खूपच आठवत होता....ते क्षण तुझी आठवण टाळुन मी वळले पून्हा नवर्याकडे .
अहो चहा घेणार का? हो पुन्हा किचनच्या खिडकीशी तुझी आठवण घेऊन.....आता मात्र लक्षात आलंच माझ्या की इतक्या दिवस मनात गडप केलेल्या तुझ्या आठवणी एक्एक मुंग्यासारख्या बाहेर पडल्या आहेत...आता या पुढील 21 दिवस हया सतावणार. कारण कधी नव्हे तो आयूष्यात इतका निंवात वेळ मिळाला आहे. खंरच वेडयासारखं प्रेम केल ना एकमेकांवर ... जाणवत ना आजही ....तुला फेसबुक शोधल्यापासुन एकमेकांच्या मनात अधिक जागा केलीय ....पण खरच नको येउस मनात.....तू मनात भावना दडवतो पण मला नाही ना दडवता येत....तु आजही तसाच आहेस माझ्या मनात माझ्या कवितेतील राजकुमार बनुन... बर ते जाऊ दे ही झाली स्वप्ने... ही माझी डायरीच आहे जि संधी मिळत आहे मला व्यक्त होण्याची .....
आज एक चिटपाखरुही नव्हते बाहेर ! मीही भांडेवालीला सुटी देउन टाकली काल. आज खूप काम केली पण त्या कामाच समाधान नाही. वैताग होतोय नुसता... मुल बसली आहे पिच्चर पाहात व मी एकटी काही ना काही काम करत . अजय शांत आहेत....काही कुणाशी बोलाव वाटत नसेल का? आज एकोणपन्नास वर्षाचा झालाय पण कशाचाही उत्साह नाही त्याला...माझ्या कवि मनाला कधी समजुच शकला नाही
व मी ही माझी शाळा, माझे लेखन, यात गूंतवुन घेतल स्वतःला .....अगदी औपचारीक नाते झालेत या सुट्टयामध्ये जाणवल.....आजम्रला या सुट्टयामध्ये काय काय शोधायच आहे ...याची जाणीव झाली लक्षात आल की माझ्या व अजयच्या नात्यात तेवढा ओलावा राहीला नाही....तो मला शोधायचा आहे व नसेल तर परत ओलावा आणायचाय....शेवटी हा माझा उंबरठा आहे माझी स्वप्ने माझे जिवन या झोक्याच्या लयीत आहे हेच माझ खरं आकाश आहे. आपण धावपळ ,करीयर च्या नादात हे विसरुनच जातो की आपण काय कमावल व काय गमावल. नात्यात रुक्षता आली मला जाणवत राहील.....पण पुन्हा या नात्यात ओल आणायला मला हे एकवीस दिवस पुरे आहेत.. मनातल्या भावनांना वाट करुन देणे व वाटेवरच्या काही लोकांना कस बाजुला करायच हे या मनाला आता समजायला पाहीजे .....आज मी पुजा केली नाही स्वामी समर्थाचा आज प्रकट दिन ना .! पण माझे स्वामी समर्थावर जितका विश्वास आहे तेवढे स्वामी माझ्या जवळ पाठीशी आहे असे वाटते. आज खुप बोलले मनातल.......धन्यवाद ग डायरी रोजच भेटु आपन रोजच्या नव्या अनुभवासह व मनातल्या गप्पासह