STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

लग्न

लग्न

6 mins
2.0K


( विजय आणि त्याचा मित्र रमेश यांच्यातील गप्पा रंगत होत्या गप्पांचा विषय अर्थातच सर्वाचा आवडता विषय म्हणजे ‘लग्न’ हाच होता.)

रमेशः तुला लग्न करावंस नाही का वाटत ?

विजयः वाटत ना ! अगदी मनापासून वाटत ! पण फक्त वाटून भागत नाही बायकोवर उधळायला खिशात पैसा ही असावा लागतो.

रमेशः बायकोवर उधळायला पैसा लागतो म्ह्णजे काय ? तू काय एखाद्या डान्स बारवाली सोबत लग्न करण्याचा विचार करतोयस की काय ?

विजयः नाही रे बाबा ! तुला तर माहितच आहे आम्ही पडलो दानशूर कर्णाचे अवतार सर्व दान करून झाल्यावर आता आमच्याकडे आमच्या होणार्‍या बायकोला दयायला आहेच काय ? बाबाजी का... नाही रे आमच्या हया नश्वर देहाखेरीज ! हा आता फक्त या नश्वर देहासाठी कोणी माझ्याशीलग्न करायला तयार असेल तर सांग ! मी तिच्याशी लग्न करायला एका पायावर तयार आहे.

रमेशः अरे ! आजकाल तू तुझ्या ज्या नश्वर देहाला तुच्छ लेखतो आहेस त्याचीच किंमत सर्वात जास्त आहे. नाही तरी माणूस पहिलांदा कोणाच्याही प्रेमात पडताना हया नश्वर देहाकडे पाहूनच प्रेमात पडतो ना ?

विजयः बाकीच्याच माहीत नाही पण मी मात्र देहासोबत जात- धर्म वगैरे गोष्टी पाहूनच प्रेमात पडायचो...नंतर उगाच लोचे नको म्ह्णून... खबरदारी ...अगोदरच घ्यायचो.

रमेशः म्ह्णूनच हजार जणींच्या प्रेमात पडूनही एकीच्या ही गळ्यात लग्नाची माळ घातली नाहीस.

विजयः त्याबाबतीत तू मला का दोष देतोस त्या हजार जणी पैकी एक तरी तुला म्ह्णाली का की तिने मला लग्न करण्याविषयी विचारल होत म्ह्णून ?

रमेशः म्ह्णजे तुझ्या भोवती पिंगा घालणार्‍या मुलींपैकी एकीने ही तुला माझ्याशी लग्न करतोस का म्ह्णून विचारलच नाही ?

विजयः नाही ना ! प्रत्येक वेळी मुली ऐवजी मुलीची आईच मला विचायची आमची ही तुला कशी वाटते ? आमची ही तुला आवडते का ? आमच्या हिच्याशी तुला लग्न करायचं आहे का ? त्यामुळे माझ्या मनात नेहमीच एक विचार न राहून यायचाच च्या मायला मुलींपेक्षा मुलींच्या आयलाचमाझ्यात जास्त रस आहे.

रमेशः अरे पण आईने आपल्या मुलीचच मन ताझ्याकडे मोकळ केले असेल ना ?

विजयः कदाचित तस असेल ही पण का कोणास जाणे असं अगदी सहज मिळालेल प्रेम मला तेंव्हा नकोस होत.

रमेशः हल्ली बरेच दिवस ताझ्या कथेतील एखाद्या नवीन ‘हॉट’ नायिकेबद्दल बोलला नाहीस, गारटलास की काय ?

विजयः बंदर कितना बी बुढा क्यो न हो जाय वह कुलाडी मारना नही भुलता...कालपरवाच एक गवसली होती पण हल्ली टाईमपास करायचा टाईमच राहिला नाही. बायकांच्या मागे माझे आतापर्यतचे अर्धाहून अधिक आयुष्य वाया गेलेय...

रमेशः वाया गेल का म्ह्णतोस ? त्यांच्यावर भाराभर कथा, कविता आणि लेख लिहलेस ते ?

विजयः हो ! तुझ बरोबर आहे तिसरीत असताना पहिल्यांदा तिच्या प्रेमात पडलो त्यानंतर कधी उटलोच नाही.

रमेशः तिसरीत तू जिच्या प्रेमात पडला होतास ती तिशीत ही तुझी वाट पाहतच होती ना ? तू लक्षच देत नाही म्ह्टल्यावर तिने लग्न करून नाईलाजाने आपली म्हातारपणीची सोय करून घेतली.

विजयः मी सांगितल नव्हत तिला माझ्यासाठी थांबायला आणि तुला वाटत तशी ती माझ्यासाठी वगैरे आजिबात थांबली नव्हती आमच्या चित्रकलेच्या सरांच्या रंगात ती अगोदरच रंगली होती. तो रंग तिचा पिछा सोडत नव्हता इतकच...

रमेशः ती जावू दे ! दुसरी जी तुला आज ही समोर दिसली तरी तू कासाविस होतोस अशी सर्वगुण संपन्न ती तिच्याशी लग्न का नाही केलस ?

विजयः कसं करणार माझ्यासारखी ती ही नालायकच होती मला सभोवताली तेंव्हा मुली लगायच्या आणि तिला मुल आमच्या दोघात फरक एकच होता मी ब्रम्हचर्य सांभाळल आणि तिने गमावल मी ते आजही राजाच्या मुखुटासारख शिरावर घेऊन मिरवतोय...

रमेशः हल्ली कोठे ती तुला दिसली होती का ?

विजयः हो दिसली होती एका उंटा सोबत रस्त्याने चालली होती. पण आता तिच्यातील वाघिणीची शेळी झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

रमेशः अरे ! पण जिच्यावर तू मनापासून प्रेम करीत होतास तिच्या आईने तुला तिच्या मुलीशी लग्न करतोस का म्ह्णून विचारल होत ना ? मग तेंव्हा हो का नाही म्ह्णालास ?

विजयः तेंव्हा जर मी हो म्ह्णालो असतो तर माझा नक्कीच ओझ वाहणारा गाढव झा

ला असता आता जसा तिचा नवरा झालेला आहे, तस तेंव्हा तिच्या आईच्या दृष्टीने मी गाढवच होतो. पण तेंव्हा ही माझ्यात लपलेल्या धुर्त कोल्हयाने मला वाचविले, तेंव्हा चवळीची शेंग असणारी ती आतानुसता भोपळा झालेली आहे आता जर मी तिच्यासोबत रस्त्याने चाललो असतो तर लोक म्ह्णाली असती ते पहा मांजरी सोबत उंदीर चालला आहे...आजही माझ्या मागे लागणार्‍या भोपळ्यांची कमी नाही पण मला लवंगी मिरचीच हवी...

रमेशः लवंगी मिरची खायची वाट पाहत राहशील तर तुझ तोंड मिरची न खाता ही पोळ्ल्या शिवाय राहणार नाही आणि मग सुकलेली कोमेजलेली वेडी वाकडी झालेली लाल मिर्ची खायची पाळी तुझ्यावर आल्या खेरीज राहणार नाही ...

विजयः ती वेळ माझ्यावर कधीच येणार नाही कारण शेर कितना भी भुका क्यों न हो वह घास नही खाता...

रमेशः शेर ! जरा जमिनीवर या आणि मला सांगा त्या नयनाच नाव तुंम्ही तुमच्या कथेतील प्रत्येक नायिकेला देता तिच्याशी लग्न करण्याचा विचार का नाही केला ?

विजयः ती नयना एकदा कधी माझ्याकडे पाहून गालात गोड हसली होती त्यावरून मला एक कथा सुचली त्या कथेतील नायिकेला मी नयनाच नाव दिल ती माझी पहिलीच कथा पण एका आघाडीच्या दैनिकात प्रकाशित झाली त्यानंतर मी माझ्या कथेतील नायिकेला नयनाचच नाव देतराहिलो आणि माझ्या कथा प्रकाशित होत राहिल्या. नयना या नावात दम आहे की माझ्या कथांमध्ये हे कोड मला आज ही उलगडत नाही. आता ती स्वतःहून जरी नाचत आली, माझ्याशी लग्न करतोस का म्ह्णत तरी माझं उत्तर नाही हेच असेल कारण तिच्याबद्दल तसा विचार मी कधीकेलाच नाही. जिच्यावर अगदी मनापासून प्रेम करावसं वाटल अशी एकच मुलगी माझ्या आयुष्यात आली पण ती अनाडी निघाली...सर्वच बाबतीत.

रमेशः एक अनाडी तरूणी आणि एक विद्वान तरूण यांची प्रेम कहाणी रंगली असती तर एक कादंबरी तर अशीच लिहून झाली असती तुझी...

विजयः तिला शिकविण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नव्हता. तशा त्यावेळी माझ्या आयुष्याच्या दरवाजावर अनेक जणी थापा मरतच होत्या...

रमेशः पण आता तर तुझ्याकडे भरपूर वेळ आहे.

विजयः आता वेळ भरपूर आहे रे पण पैसा भरपूर नाही ना पूर्वीसारखा ! कोणाला मॉल मध्ये घेऊन जायला.

रमेशः मी कोठे तुझ्या वहिणीला पटविण्यासाठी मॉलमध्ये घेऊन गेलो होतो?

विजय अरे ! पण वहिणी लग्नापूर्वी मॉलमध्येच कामाला होती ना ?

रमेशः च्या मायला मी ते विसरूनच गेलो होतो.

विजयः मॉल ही आता पूर्वीसारखा खात्रीचा राहिलेला नाही बाबा.

रमेशः ते जावू दे ! मला वाटत तुला लग्नच करायच नाही म्ह्णून तू ही भाराभर कारणे पुढे करत असतोस .

विजयः हो ! मला लग्नच करायच नव्हत ते जर करायच असत तर विनाकारण हजार जणींच्या कोमळ हृद्याशी का खेळत राहिलो असतो.

रमेशः पण का ? काही तरी कारण असेलच ना ?

विजयः लहानपणापासून मी नवरा – बायकोला एकमेकांच्या उरावर बसताना पाहत आलोय, एकमेकांच्या चारित्र्याबद्द्ल संशय घेताना पाहत आलोय, नवरा - बायकोचे अनैतिक संबंध पाहत आलोय, नवरा – बायकोला एकमेकांच्या मरणाची वाट पाहतानाही पाह्त आलोय, फक्त शरीरसुखासाठी केलेली आयुष्यभराची तडजोड म्ह्णजे ‘लग्न’ या ठाम निषकर्शा पर्यत मी येऊन पोहचलोय. मला समाजात राहून समाजासाठी काही तरी करायचय म्ह्णून मी समाजात राहतोय नाहीतर कधीच सन्यास घेऊन भगवी वस्त्रे धारण केली असती. आज ही मी जे जीवन जगतोय ते एकासन्याशाचचं जीवन आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार्‍या एकमेकांचा आधार ठरणार्‍या आणि फक्त प्रेमाने बांधल्या गेलेल्या नवरा – बायकोंबद्द्ल मला आदरच आहे आणि त्यांना एका नात्यात गुंफून ठेवणार्‍या लग्नसंस्थेबद्द्ल मला अभिमानच आहे. पण माझ्या मनात इतक्याशंका आहेत की त्या शंकांच निरसन होण्या ऐवजी दिवसागणिक त्यात अधिकच बर पडत आहे.

रमेशः तुझ्या सर्व शंकांच निरसन करणारी तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारी तुझी काळजी वाहणारी तुझ्याकडून प्रेमाव्यतिरीक्त फारशी कसली अपेक्षा नसणारी जर कोणी तुझ्या आयुष्यात आली तर लग्नाचा विचार करशील की नाही ?

विजयः हो नक्कीच करेन पण तिच्या नश्वर देहासाठी नाही तर त्या देहातील हृद्यात खोलवर दडलेल्या अमर प्रेमासाठी...पण कदाचित ! हे माझ्या स्वप्नातच घडेल...


Rate this content
Log in