कुंडलकेशी
कुंडलकेशी
ही गोष्ट "संगम साहित्यातील" पाच तामिळ महाकाव्यपैकी एक आहे, याची रचना ई. स.पु.300 ते ई. स. 600 मध्ये झाली व हे साहित्य पुर्ण पणे बौद्ध धर्मावर आधारित असल्यामुळे हे साहित्य नष्ट करण्यात आले व हि कथा फक्त याचा उल्लेख असलेल्या दुसर्या ग्रंथातून घेतला आहे.
कुंडलकेशी ही एका धम्म परिवर्तन केलेल्या बौद्ध भिक्षुकी ची गोष्ट आहे...
या महिलेचा जन्म पुहार नगरच्या व्यापारी कुटुंबात (वैश्य समाजात - शिवाची उपासना करणार्या समाजात झाला) झाला. तीचे नाव "भद्रा" होते.
तीने आपल्या लहान पणीच आपल्या आई ला गमावले होते आणि ती खूप एकाकी जिवन जगत होती. एका दिवशी अचानक तिच्या नजरेसमोर एक सुंदर तरुण चोर पुहार नगराच्या रस्त्यावरून जाताना बघीतला व तीच्या प्रेमात पडली, त्या चोराचे नाव होते कालन, कालन ला चोरी बद्द्ल म्रुत्यु ची शिक्षा झाली होती, कुंडलकेशी ने स्वतः च्या वडीलांना सगळाप्रकार सांगितला व त्याला सोडविण्याची माघनी केली, तिच्या वडिलांनी राजाकडे दयेची मागणी केली व त्याला सोडण्या
साठी विनवण्या केल्या, त्याने त्या साठी कालण च्या वजना एवढे सोने व 81 हत्ती राजाला दिले व कालण ची सुटका करून घेतली. नंतर कुंडलकेशी आणि कालण चे लग्न झाले व ते काही काळासाठी आनंदाने जगु लागेल.
एक दिवस, तीने त्याला विनोदाने चोर म्हणून संबोधले. याचा कालन ला खूप राग आला व त्याने आपल्या पत्नीला मारून सुड उगवायचा ठरवलं. आणि त्याने एक शक्कल लढवली, तिला तो डोंगरावर फिरायला घेऊन गेला. व तेथे गेल्यावर त्याने सांगितले की तो तिला त्या डोंगरावरून धक्का देऊन मारणार आहे. कुंडलकेशी ला प्रकार ऐकून धक्का बसला आणि ती त्याला शेवट ची इच्छा पूर्ण करण्यास सांगितले व त्याने ते मान्य केले. तीने मरना आगोदर त्याच्या भोवती तिन फेरी मारून त्याची पुजा करायचे ठरवले व जसा त्याच्या मागे ती आली तीने त्याला वरून ढकलून दिले, व मारुन टाकले.
मग तिला तिच्या कार्याचा पश्चाताप होऊ लागला, आणि नंतर ती बौद्ध भिक्षुकी झाली आणि तिने आपले उर्वरित आयुष्य बुद्धाच्या शिकवणी चा प्रचार व प्रसार करण्यासाठी घालवले.