Pradnya Labade-Bhawar

Others

3  

Pradnya Labade-Bhawar

Others

घास_तिखट_मिठाचा

घास_तिखट_मिठाचा

3 mins
221


काही लोकांना दुसर्‍यांच्या घरात काय डोकायचं असतं हेच कळत नाही गं आई, काही दिवसापूर्वी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, "अहो सुधाताई ,अगोदर किती स्वच्छ असायचं तुमचं घर आणि आता सुन आली, तर किती पसारा." तूच सांग आई लहान बाळ असेल तर पसारा होणारच ना .

आईंनी नाही लक्ष दिलं पण मला खूप वाईट वाटलं बघ. एकदा यांचे कोणते लांबचे काका घरी जेवायला आले. ताटातले उजवीकडचे पदार्थ डावीकडे वाढले म्हणून अक्षरशः खेकसलेच माझ्या अंगावर. काय फरक पडतो गं सगळं पोटातच जाणार आहे ना,डावीकडे काय, उजवीकडे वाढलं काय. अगदीच फटकळ होते बघ. असे लोकं का येतात आयुष्यात काय माहीत. माहेरी आलेली आरती जेवण करताना चिडचिड करत आईला सांगत होती आणि बोलता बोलता तिला ठसका लागतो.


 आई- " अगं, हळूहळू .तुला ना जास्त गोड खायची सवय आहे बघ.मग असं कधीतरी तिखट पदार्थ केला ना की ठसका लागतो. 

 आरती - "ते जाऊ दे गं, मी काय बोलते आणि तुझं काय "

 आई- "अग तेच सांगते, काही माणसं असतात गं अशी. काही गोड, काहीआंबट तर काही तिखट. प्रत्येक व्यक्ती सारखा कसा असेल.

आता बघ काही माणसं खूप तिखट असतात पण हीच माणसं मनाने निर्मळ असतात हो. जे मनात तेच ओठात, आणि जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा हीच माणसं सगळ्यात अगोदर आपल्या मदतीला येतात ,जशी तिखटामुळे भाजी झणझणीत होते की नाही ह्या माणसामुळे आपणही झणझणीत म्हणजेच खंबीर होतो आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करत नाही"


 काही नातेवाईक मिठासारखे असतात. जसं मिठाशिवाय भाजी बेचव होते ना असच आपलं आयुष्यही यांच्याशिवाय बेचव होतं बघ. पण हा जसं मीठ जास्त चालत नाही ना तसच आपल्या संसारात नातेवाईकांची लुडबूड जास्त होऊ द्यायची नाही. हा कसब मात्र हवा आपल्याकडे. म्हणजे आयुष्यात मीठासारखी माणसं हवीच पण अतीही नको नाही का. शेजाऱ्यांचं म्हणशील ना तर ते अगदी हळदी सारखे असतात, जसे हळदीचं अस्तित्व फारसा दिसत नाही, पण पदार्थाचा रंग हा त्याच्यावर खूप अवलंबून असतो आणि हळदीचे फायदे किती असतात ग. तसंच शेजाऱ्यांचं. आपण दोन दिवस कुठे गेलो की शेजारीच तर आपल्या घरावर लक्ष ठेवतात, रात्रीअपरात्री काही इमर्जन्सी आली तर शेजारीच धावून येतात ना. आपण कसं हळदीचा कडूपणा बाजुला ठेवून हळदीचा गुण बघतो. तसेच शेजार्‍यांकडे बघायचं आणि त्यांचे अवगुण सोडून गुण बघायचे. आणि राहीलं गोड माणसांचं, तीही हवीच ग. ते आपल्याबद्दल गोड बोलतात, कौतुक करतात त्यामुळेच आपला दिवस आनंदात जात असतो, पण जास्त गोड ही चांगलं नाही ना, तसंच कुणी आपल्याबद्दल जास्त गोड बोललं आपलं कौतुक केलं की आपण त्यातच गुंतून राहतो आणि मग आपली प्रगती थांबते. आपण आळशी होतो . त्यामुळेच आयुष्यात गोड घास हवाच पण त्याचबरोबर तिखट-मीठाचाही घास घ्यायला हवाच.


  आणि हो तू माहेरी कशासाठी आली आहेस. थोडे दिवस आमच्यासोबत घालवायला ना, मग जरा माझ्या हातचा पदार्थांचीही चव घे की. आणि तुमच्या घरातल्या पदार्थांनी तयार केलेली भाजी तिथेच ठेवायला शीक जरा. आपल्या पदार्थात कधी तिखट जास्त होतं तर कधी मीठ. ती जर अशी सगळीकडे वाटायला लागलीस तर तुझ्या वाट्याला काय राहणार? आपलं आपल्याजवळ ठेवावं.

 आरतीला आईचं म्हणणं पटतं आणि ती सगळी चिडचिड विसरून आनंदाने आईच्या हातचं जेवण करते.


Rate this content
Log in