"गांधीजी आपल्या मनात "
"गांधीजी आपल्या मनात "
विनू ! "अरे विनू ऊठ ना रे"...... "घड्याळात बघ किती वाजले". ..."ऊन डोक्यावर आलेय"...."ऊठ बरे आता"... झोपू दे ना गं आई ! "आज रविवार आहे ना"... विनू म्हणाला... "अरे तुला उद्याच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ची तयारी पण करायचीय ना"?...आई मोठ्याने म्हणाली... आईची सततची हाक ऐकून विनू महाराज कसेबसे डोळे चोळत उठले ...आज आईला पण सुट्टी असल्याने ती त्याच्याजवळ आली.(हा संवाद ८ वर्षाच्या विनू आणि त्याच्या आईमधील आहे )
विनूच्या शाळेत दुसर्या दिवशी २ अॉक्टोबर असल्याने .... अर्थातच सर्वांचे लाडके बापू महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त स्पर्धा आयोजित होणार होत्या. विनूने पण भाग घेतला होता .तेव्हा आई म्हणाली तुला बाईंनी काय बनायला सांगितले आहे..विनू म्हणाला, "मी उद्या महात्मा गांधी बनणार आहे".. मला खूप आवडतात ते.. इतरांपेक्षा वेगळेच होते ना ते ?
आई म्हणाली की, "बरोबर आहे तुझे पण तू फक्त उद्या त्यांचा वेश परिधान करशील" ....आणि तुला कदाचित छान बक्षिसही मिळेल ...आणि पुन्हा विसरशील सगळे... पण जर तू त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा एक तरी गुण घेतला तरी खऱ्या अर्थाने गांधी जयंती साजरी होईल... आताचेच बघ ना आज रविवार म्हणून तू लवकर ऊठला नाही पण तुला माहित आहे का की गांधीजी दररोज पहाटे लवकर उठायचे.. सर्व आवरुन ते पहाटे ५:३० वाजता प्रार्थनास्थळी जाऊन प्रार्थना करायचे ...ते वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर होते. आता विनूला आईचे म्हणणे पटले होते आणि स्वत:ची चूकही लक्षात आली होती... विनूची उत्सुकता वाढली होती आता....तो आईला म्हणाला, "मला आणखी सांग ना बापूंबद्दल"... सकाळची वेळ असल्याने आई म्हणाली, "तू सर्व आवर मी तुला त्यांच्याबद्दल आणखी सांगते."पण आता एकच लक्षात ठेव की, "नुसते गांधीजींसारखे कपडे घातल्याने आपण त्यांच्यासारखे बनू शकत नाही"... आपल्या मनात ते असायला हवेत... त्यांचे विचार आपण आत्मसात करायला पाहिजे... आता विनू बराच विचारात पडला होता.......
