STORYMIRROR

Vedashree Vyas

Others

2  

Vedashree Vyas

Others

एकादशी

एकादशी

3 mins
99

काल सकाळी सकाळी उठल्यावर लगेच कानावर पडलं , खेळ मांडीयेला वाळवंटी घाई नाचती.....कोणी लावलंय बघितलं तर माझी आजी ऐकत बसले होते . हे गाणं कानावर पडल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर शाळेतील स्नेहसंमेलनाचे सुवर्णाक्षण superfast express प्रमाणे एका झटक्यात गेले , आणि स्वतःच गुणगुणू लागले विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.... (आठवीत असतांना आमचं ते वर्गगीत होतं आणि आमच्या वर्गाचा प्रथम क्रमांक पण , न चुकता आला होता...! पाचव्यावर्गापासून आमच्या वर्गाचा पहिला क्रमांक ठरलेला फक्त एक वर्ष उत्तेजनार्थ...!! ) तितक्यात आई मागून बोलले," उद्या आषाढी एकादशी आहे लक्षात ठेव , नाही तर सकाळी उठून लक्षात नाही राहील म्हणून लगेच काही तोंडात घालशी....😏😂" मी म्हंटल , "आई बरं झालं आठवण करून दिलीस पण मला कळल्यावर खरचं मी काही खाल्लं असत का अस तस...🙄" 


आता आषाढी एकादशी म्हंटल तर डोळ्यासमोर पहिलं येणार चित्र म्हणजे " वारी " . वारीला प्रत्यक्षपणे मी तरी अजून अनुभवलेलं नाही पण अप्रत्यक्षपणे अनुभवलं , लहानमुलापासून ते म्हाताऱ्या माणसांचा पण काय तो जोश ! Bollywood dancers मध्ये काय पडलं आहे हो खरी मज्जा तर यातचं असते...!! फुगडी खेळतांना सत्तरावी ओलांडलेला भोवरा तो अपार शक्ती असलेल्या चक्री वादळाप्रमाणे गोल गोल भराभर गिरक्या घेतांना बघायला भेटत , देहू-आळंदीपासून ओनामा केलेली वारी अगदी पंढरपूरलाच जाऊन शांत होते..!! वारीमध्ये अगदी मनमोकळेपणाने सगळ्यांनी सोबत केलेला विठूचा तो गजर मंत्रमुग्ध करणारा आणि dj च्या आवाजाला पण लाजवणार असतो , ते अध्यात्मिक वातावरण अगदी भान हरपवणार असते . महाराष्ट्रात असून जर एकादशीची वारी नाही अनुभवली तर , महाराष्ट्रात राहून तरी काय केलं ? असा प्रश्न पडायचा . कधी कधी विचार केला तर वाटत , आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती , परंपरा कुठे तरी हरवत चाललीय या विषयावर पण बोलण्यासारखं बरचं काही आहे . दिवसेंदिवस माझ्या वयातील , माझ्यापेक्षा कमी वयातील मुलांमध्ये आध्यात्मिक गोष्टीबाबतची आवड कमी होतांना दिसते , आताच्या मुलांना भजन ऐकतांना टाळ्या वाजवण्यात लाज वाटते मात्र disco मध्ये जाऊन नाचायला फारचं आवडतं ! आश्चर्यच म्हणावं नाही का....!! महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं पण आमच्या पिढीतील मुलांना एखाद्या संताविषयी दोन शब्द बोल म्हणावं त्यांना दोन शब्द काय त्यांचं पूर्ण नाव काय हे पण माहीत नसतं , आता आणखी काय म्हणावं !! इथे महाराष्ट्रात असून काही जणांना आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकायला कमीपणा वाटतो (स्वतःच्या मातृभाषेचा आदर कमी होतो) तर संतसाहित्य तर दुरचीच गोष्ट म्हणावी...!! माझ्यामते संतसाहित्य हा एक विषय फक्त कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर आधी पासूनच शिक्षणात असायला हवा , त्या निमित्ताने का होईना संतावर दोन शब्द तर तोंडून निघेल...!! असो . हा विषय बंद , नाही तर कळायचं कुठल्या विषयावरून मी कुठे पोहचले . पण जर काही लिहावं म्हंटल तर या विषयावरून त्या विषयावर पोहोचणं गरजेचं असत शेवटी प्रत्येक गोष्टीवर मत मांडण हे माझं काम आणि वाचतांना कमी लिहिलं असं वाटू नये म्हणून वाढवण हेच त्या मागचं कारण बाकी काही नाही हो , इकडे पहिले वहीत लिहून मोबाईल मध्ये type करण म्हंटल तर कंटाळा फार येतो पण इथे कंटाळा करून काही चालायचं नाही...!! वहीत आधी लिहिल्याशिवाय काही लिहिलंय अस मला जाणवतच नाही , त्यामुळे double काम होत. असो , आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा , आपला दिवस मंगलमय जावो . उपवासाचा पोटभर खा प्या थोडं आमच्याकडे पण पार्सल पाठवून द्या !! ते पण आठवणीने 😁 आणि हा शेवट एकच सांगू इच्छिते बाकी काही ही म्हणा पण , 

            ज्यासी वाचनाचा छंद

            त्याचा सखा पांडुरंग ।।


Rate this content
Log in