Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Subhadra Warade

Others


4  

Subhadra Warade

Others


दिवाळीनंतरचे चार दिवस

दिवाळीनंतरचे चार दिवस

2 mins 1.5K 2 mins 1.5K

दिवाळी ! वसू बारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बळी प्रतिपदा, आणि भाऊबीज अशा पाच उत्सवांचा महोत्सव म्हणजे दीपोत्सव. जीवनात आनंदाचा उत्सव म्हणजे दीपोत्सव. फटाके, आकाश कंदील, पणत्या, लाईटिंग, नवे कपडे, गोडधोड पदार्थांची रेलचेल. पाहुण्यांची वर्दळ. सगळं कसं आनंदी आनंद.

पाहुणे आलेले. एकत्र जेवण, गप्पांची महफील. बाळ गोपालांच्या गाण्यांच्या भेंड्या. कोडे, उखाणे, खेळ असे अनेक काही बाही. सगळं आनंदी आनंद. हे दिवस भरलेले, मंतरलेले, जणू संपूच नये वाटते कधीच. पण ते संपतातच. असेच तर असते जीवन . जे आपल्याला हवे असते ते सदा सर्वकाळ कसे राहील? सतत बदलत राहणे हाच तर निसर्गनियम. दीपोत्सवाचे हे असेच मंतरलेले दिवस भुर्रकन उडून जातात. मग उरते नुसते भयाण विरहाचे दिवस.

दिवाळी नंतरचे चार दिवस मात्र अगदीच नकोसे वाटणारे. पाहुणे सारे परतलेले. बायका मुले गावाला, रिकामे घर खायला उठते जसे. जेवणाचे सारे वांधेच वांधे, मिळेल ते खायचे. रोज रोज फराळ खाऊन पोट बिघडण्याची शक्यता, तोंड बेचव झालेलं.

असे का? यातून काही तरी शिक्षण नक्कीच मिळत असेल. नाही का? बघ एकटे रहाता येते का? कधीतरी स्वयंपाक हाताने करून बघ, चव जमते का? भांडे, कपडे धुतांना बघ बायकोची आठवण येते का? स्वयंपाक करतांना कशी मजा येते ना? भाजी बनवतांना तर भारीच, मीठ कमी नाहीतर जास्त, कधी तिखट तर कधी अगदीच सपक. तेव्हा कुठे बायकोची महती कळते. हे सारं शिकण्यासाठीच तर जीवनात असे दिवस येत नसतील ना?

याच दिवसात नात्यांमधील दृढता लक्षात येते.दिवाळीनंतर आजूबाजूच्या घरातील दिवाळी पाहायला मिळते. एकमेकांच्या घरी फराळ करायच्या निमित्ताने एकत्र आल्यावर तिथली परिस्थिती लक्षात येते. मने जुळतात. आत्मीयता निर्माण होते. काही शिकायला मिळते.

खरोखर दिवाळी नंतरचे हे चार दिवस जीवनात अनेक अनुभव घेऊन येतात , देऊन जातात. या दिवसात मिळालेली शिकवण सदैव ध्यानात ठेवावी. आयुष्य या अनुभवाने उजळून घ्यावे.

पंडित वराडे,

9881749224

औरंगाबाद

१२.११.२०१८


Rate this content
Log in